murder 
पुणे

संपत्तीच्या वादातून ज्येष्ठाचा डोक्यात घातले दांडके...

नितीन बारवकर

शिरूर (पुणे) : संपत्तीच्या वादातून शिरूर येथील बाजारपेठेतील ज्येष्ठाचा डोक्‍यात दांडके टाकल्याने मृत्यू झाला. रविवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास ही घटना घडली. मकबूल अब्दुल रहिमान खान (वय 70), असे त्यांचे नाव आहे. 

याबाबत मकबूल खान यांचा मुलगा अब्दुल जहिर मकबूल खान याने दिलेल्या फिर्यादीवरून जफर रहिम खान, मोसीन नासरखान पठाण, रमजान ऊर्फ टिपू आदम पटेल, तस्सवूर ऊर्फ सलमान ताहिरअली शेख (सर्व रा. कापड बाजार, शिरूर) यांच्याविरुद्ध शिरूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. टिपू पटेल घटनेनंतर पळून गेला असून, इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी अब्दुल जहीर खान यांच्या आजीच्या (आईची आई) नावे असलेल्या शिरूरमधील स्थावर मालमत्तेचा वाद सन 2013 पासून शिवाजीनगर न्यायालयात चालू आहे. यातील एक दूमजली इमारत "इलियासबी मंझिल' कापड बाजार परिसरात आहे.

फिर्यादीच्या माहितीनुसार, ती अब्दुल जहीर यांच्या आईच्या जैबून्निसा मकबूल खान हिच्या मालकीची असल्याने ते स्वतः, वडील मकबूल, पत्नी रेश्‍मा; तसेच खालेदा इलियास शेख व फहिमिदा मतिन खान या बहिणींसह सकाळी तेथे गेले. तेव्हा इमारतीचा दरवाजा आतून बंद असल्याने दरवाजा वाजविला, परंतु न उघडल्याने अब्दुल जहीर व त्यांच्या वडिलांनी धक्का देऊन दरवाजा उघडला व आत जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळई मोसीन पठाण, जफर खान व इतरांनी दांडक्‍याने हल्ला केला. लाकडी दांडके डोक्‍यात बसल्याने मकबूल खान यांचा जागीच मृत्यू झाला. या वेळी मोसीन, जफर, टिपू व सलमान यांनी फिर्यादी, त्यांची पत्नी व बहिणींनाही लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. 

या घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे, सहायक पोलिस निरीक्षक बी. एन. काबुगडे, पोलिस उपनिरीक्षक बी. जे. पालवे व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांना तातडीने ताब्यात घेतल्याने तणाव निवळला. तथापि, भर बाजारपेठेत घडलेल्या या घटनेने काही काळ खळबळ उडाली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT