पुणे

आळेफाटा बसस्थानकाजवळ एका अज्ञात व्यक्तीचा खून

सकाळवृत्तसेवा

आळेफाटा : आळेफाटा येथील एस. टी. बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत एका सुमारे तीस ते पस्तीस वर्षीय अज्ञात व्यक्तीच्या डोक्यात सिमेंटचा ब्लाॅक टाकून खून करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी ( दि ९) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, आळेफाटा (ता.जुन्नर) येथील एस. टी. बसस्थानकाच्या मागील बाजूस आळे गावच्या हद्दीत जाग्रुती लाॅजजवळ असलेल्या एका रिकाम्या जागेत, एका सुमारे तीस ते पस्तीस वर्षीय अज्ञात व्यक्तीच्या डोक्यात कामाचा सिमेंटचा ब्लाॅक घालून खून करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर पवार व त्यांच्या सहका-यांनी तसेच आळे गावचे पोलीस पाटील सुनील पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली व घटनेबाबत माहिती घेतली. तसेच आजुबाजुला असलेल्या दुकानांमधील सी सी टीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सदर अज्ञात व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसून, घटनास्थळी असलेल्या परिस्थितीवरुन हा इसम कामासाठी बाहेर गावाहून या ठिकाणी आला असण्याची शक्यता असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. हा खून नेमक्या कोणत्या कारणाने झाला हे अद्यापपर्यंत समजू शकले नसून, पुढील तपास आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर पवार करत आहेत.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

SCROLL FOR NEXT