crime11.jpg
crime11.jpg 
पुणे

धक्कादायक ! दगडाने ठेचून 'त्याचा' खून केला अन्...

सकाळवृत्तसेवा

हडपसर (पुणे) : महम्मदवाडी येथे निर्जनस्थळी एका पंचवीस वर्षाच्या अज्ञात तरुणाचा दगडाने ठेचून खून केला, त्यानंतर मृतदेहावर दगडी ठेवून झाकून ठेवण्यात आल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी पार्कच्याजवळ दोन ते तीन दिवसापूर्वी मृतदेह दगडाखाली लपवून ठेवल्याने तो कुजून दुर्गंधी पसरल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली, माहिती मिळताच वानवडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अद्यापपर्यंत त्याची ओळख पटली नाही.


वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी संगितले की, मृतदेहाच्या अंगावरती जीन्सची पॅंट व अंगावर निळा चौकडी शर्ट आहे. सावळा वर्ण व उंची पाच फूट पाच इंच आहे, पायामध्ये स्पोर्ट शूज आहेत. याबाबतची माहिती कोणाला असेल तर त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT