N95 Mask 
पुणे

डॉक्‍टरांच्या चिठ्ठीवरच ‘एन ९५’ मास्क

सकाळवृत्तसेवा

पुणे - डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय राज्यात ‘एन ९५’ मास्कची विक्री करण्यावर ‘अन्न व औषध प्रशासना’ने (एफडीए) बंदी घातली आहे. तसेच, मास्कसह वैयक्तिक सुरक्षिततेसाठी अत्यावश्‍यक साहित्याची (पीपीई किट्‌स) बेसुमार दराने होणारी विक्री रोखण्यासाठी हा आदेश दिला आहे. 

जगातील विविध देशांमध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग वेगाने होत आहे. भारतातही गेल्या दोन दिवसांपूर्वी एकाच दिवशी १५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले, त्यामुळे आतापर्यंत देशाच्या उंबरठ्यापर्यंत आलेल्या कोरोना विषाणूंनी देशात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या संसर्गाला प्रतिबंधासाठी पुण्यासह राज्यात सर्जिकल आणि ‘एन ९५’ प्रकारच्या मास्कची विक्री एका दिवसात अफाट वाढली, त्याला रोखण्यासाठी राज्याच्या ‘एफडीए’चे आयुक्त अरुण उन्हाळे यांनी हा आदेश दिला आहे. राज्यातील सर्व सहआयुक्त आणि सहायक आयुक्त (औषध) यांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. 

भारताच्या शेजारी असणाऱ्या चीनमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूंच्या संसर्गाचा उद्रेक झाला आहे. त्याबरोबरच जगातील इतर देशांमध्येही याचा संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे. काही राज्यांमध्येही याचा संसर्ग झाल्याचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या विषाणूंना प्रतिबंध करण्यासाठी मास्क, सॅनिटायजर, हॅंड ग्लोज यांची मागणी वाढली. या पार्श्‍वभूमीवर या वस्तूंचा राज्यात तुटवडा होऊ नये आणि त्या वस्तूंचे दर नियंत्रणात राहावेत यासाठी हे पाऊल उचलले आहे. 

‘एन ९५’ मास्कसह ‘पीपीई किट्‌स’ची विक्री औषध दुकानांमधून केली जाते. याच्या मूळ किमतीपेक्षा जास्त दराने याची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे, त्यामुळे व्यापक जनहिताचा विचार करून ‘एन ९५’ आणि ‘पीपीई किट्‌स’ची विक्री यापुढे डॉक्‍टरांनी दिलेल्या औषधाच्या चिठ्ठीवरच होईल, याची दक्षता घेण्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच, कोरोनाच्या भीतीमुळे या वस्तूंची साठेबाजी होणार नाही, यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही नमूद केले आहे. या वस्तूंचे उत्पादक, पुरवठादार, विक्रेते यांच्याकडील साठ्याची पडताळणी करून त्या आधारावर पुढील कार्यवाहीच्या सूचनाही दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुलुंडमध्ये मोठी दुर्घटना! मेट्रोचा स्लॅब कोसळला; एकाचा मृत्यू, 3 ते 4 जखमी; तर अनेकजण अडकल्याची भीती

Sharad Pawar Health Update : शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज, पुढचे काही दिवस पुण्यातील घरीच विश्रांती

'आज वडिलांना खूप आनंद होईल...', Rahul Dravid भावूक; अनिल कुंबळेसह भारताच्या 'द वॉल'चं नाव चिन्नास्वामीवर कायमचं कोरलं जाणार

Yermala News : धाराशिव जिल्हा पारिषदेत दोन्ही सेना येणार एकत्र! सत्तेच्या सारीपाटात भाजपाला रोखणार का?

Mhada: घरासाठी आता आर्थिक ताण नाही, म्हाडाचा दिलासादायक निर्णय

SCROLL FOR NEXT