Pune : नागपूरची संत्री बाजारात दाखल sakal
पुणे

Pune : नागपूरची संत्री बाजारात दाखल

यंदा चांगल्या पावसामुळे संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात

सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड : बाजारात केशरी, पिवळी संत्री दिसू लागली आहे. चवीला आंबट गोड असणाऱ्या संत्र्यांचा मोहक असा पिवळा आणि केशरी रंग पाहून संत्री सोलून खाण्याचा मोह कुणालाही आवरता येत नाही. त्यामुळे दरवर्षी संत्र्यांना मोठी मागणी असते. फळ बाजारात नागपूर येथील संत्र्याचा हंगाम सुरू झाला आहे. यंदा चांगल्या पावसामुळे संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. तसेच मालाचा दर्जाही चांगला आहे.

बाजारात आवकेच्या तुलनेत संत्र्याला मागणी चांगली आहे. तसेच मालाचा दर्जा चांगला असल्याने भावही मागील वर्षीच्या तुलनेत जास्त आहेत. शहर उपनगरासह गोवा येथून संत्र्याला मोठी मागणी असते. फळबाजारात परतवाडा या भागातून दररोज ४०-५० टन इतकी संत्र्याची आवक होत असल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी करण जाधव यांनी सांगितले. यंदा पाऊस हंगाम वेळेवर सुरू झाला आहे. पाऊस चांगला झाल्याने संत्र्याचे उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत जास्त आहे.

सुरूवातीला बाजारात चार तर पाच टन इतकीच संत्रीची आवक होत होती. हंगामाच्या सुरूवातीला संत्री चवीला आंबट गोड होती. आता हंगाम बहरला असून बाजारात दाखल होत असलेली संत्री चवीला गोड असून त्याचा आकार आणि दर्जाही चांगला असल्याचे जाधव यांनी सांगितले.

येथून येते संत्री नागपूर, परतवाडा, अंजनगाव, अचलपुर, वरूड, चिखली, अमरावती या भागातून संत्र्याची आवक होत आहे. सध्या बाजारात दर्जानुसार संत्र्याच्या ८ ते १० डझनाच्या एका पेटीस ८०० ते १००० रूपये, ११ ते १२ डझनाच्या पेटीस ७०० रुपये, १४ डझन पेटीस ६०० रुपये भाव मिळत आहे.

'यंदाचा हंगाम मागील वर्षीच्या तुलनेत अतिशय चांगला आहे. परतवाडा हे संत्र्याचे हब आहे. या संत्र्याला राज्य परराज्यातील ग्राहकांसह घरगुती ग्राहक, ज्युस विक्रेते यांच्याकडून चांगली मागणी आहे. ऑक्टोंबर महिन्यापासून संत्र्याचा हंगाम सुरू होऊन तो जानेवारी महिन्याअखेरपर्यंत संपतो.'

- करण जाधव, व्यापारी, मार्केट यार्ड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: विद्यार्थी आंदोलनात हस्तक्षेप करण्याचे कारण काय? बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या निर्णयावर CJI सूर्यकांत भडकले

Mitchell Starc: मिचेल स्टार्कने रचला इतिहास! कपिल देवांना मागे टाकलं, मुरलीधरन नंबर-1; टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट कोणाच्या नावावर?

लाँग डिस्टन्स रिलेशनमध्ये राहूच नका... आजच्या पिढीला मृणाल दुसानिसचा सल्ला; म्हणते- १०- ११ वर्षांपूर्वी...'

Konkan Rare Flower Discovery : नष्ट होण्याच्या मार्गावर असलेली वनस्पती कोकणात! मशालीसारख्या दिसणाऱ्या दुर्मीळ 'कंदीलपुष्पा'चे वैशिष्ट्य काय?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरणात राहुल गांधींना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाने कार्यवाही केली रद्द

SCROLL FOR NEXT