पुणे - पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयांतील सर्व म्हणजे, दीडशे बेडवरील रुग्णांना आता पूर्णवेळ ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे तर व्हेंटिलेटरच्या रुग्णांनाही ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. त्यासाठी खास रुग्णालयाच्या आवारात 13 किलो लिटरचा (लिक्विड) ऑक्सिजन टॅंक उभारण्यात येत आहे. अत्यवस्थ रूग्णांना नेमके उपचार देऊन, मृत्यूदर शून्यावर आणण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. शहरात येत्या डिसेंबर आणि जोनवारीत कोरोनाचा दुसरा टप्पा येण्याची भीती असून, या काळात अत्यवस्थ रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग आणि ऑक्सिजन बेड वाढविण्याची सूचना केंद्रीय पथकाने दिल्या आहेत. त्याची दखल घेत, महापालिकेने आता खबरदारी म्हणून पावले उचलण्यास सुरवात केली आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यांत ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत झाल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांची धावपळ झाली. या काळात चाकण आणि अन्य ठिकाणांहून ऑक्सिजन मागविण्यात आले. तरीही पुरेसा पुरवठा झाला नव्हता. नायडूत सध्या "जम्बो' सिलिंडरच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरविला जातो. मात्र, "व्हेंटिलेटर' च्या रूग्णांना अधिक ऑक्सजनची गरज असल्याने चार तासात सिलिंडर संपत होते. ते पुन्हा पुन्हा भरावे लागत असल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली.
पुण्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी केंद्रीय पथकाच्या सूचनांनुसार उपचार व्यवस्था तयार ठेवत आहोत. या पुढच्या काळात प्रत्येक गरजू रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयांत उपचार मिळतील, यालाच प्राधान्य आहे.
-रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
पहिल्या टप्प्यांत ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची गरज भासत होती. ती भागवताना आरोग्य खात्यापुढे अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता त्यांचा विचार करून डॉ. नायडूत स्वतंत्र ऑक्सिजन टॅंक उभा करीत आहोत.
डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.