Pune bypoll Election Esakal
पुणे

Pune bypoll Election : राष्ट्रवादीकडून मुलाखती घेण्याआधीच नाना काटेंनी विकत घेतला होता उमेदवारी अर्ज

चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवारी अखेर जाहीर, भाजपला रोखण्याची जबाबदारी नाना काटेंकडे

सकाळ डिजिटल टीम

भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर आज राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाने नाना काटे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. ही जागा बिनविरोध होईल अशी स्थिती असताना राष्ट्रवादीने अखेरच्या क्षणी नाना काटे यांना उमेदवारी देऊन ही निवडणुक बिनविरोध केली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर करण्याआधीच नाना काटे यांनी नामनिर्देश पत्र विकत घेतलं होतं. विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी चिंचवड विधानसभेतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्याआधीच राष्ट्रवादीकडून नाना काटे यांनी अर्ज विकत घेतल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं होतं. नाना काटे यांनी 2014मध्ये चिंचवड विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 42 हजार 553 मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढणार यावर खूप अधिच शिक्कामोर्तब झाले. पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसने एकमुखाने हा निर्णय घेतला होता. शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यासमोर प्रस्ताव मांडण्यात आला होता. चिंचवड शहरातील काही नावांची जोरदार चर्चा सुरू होती. त्यात नाना काटे यांचं देखील नाव होतं. मात्र राष्ट्रवादीची पोटनिवडणुकीबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट करण्याआधीच नाना काटे अर्ज विकत घेतला होता.

आज कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवार आपला अर्ज भरू शकतात. या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत. तर या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध करण्यासाठी भाजप सुरवातीपासून प्रयत्नशील होते. परंतु महाविकास आघाडीने आपल्या निर्णयावर ठाम राहत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT