Nana Patole
Nana Patole Sakal
पुणे

भाजपला सत्तेचा माज आणि गुर्मी आहे; नाना पटोलेंची टिका

सकाळ वृत्तसेवा

पुणे - 'भाजपला (BJP) सत्तेचा माज व गुर्मी आहे, शहरातील ऍमेनीटी स्पेसच नव्हे, तर भाजपने देशच (India) विकायला काढला आहे. त्यांच्या चुकीच्या धोरणामुळेच पेट्रोल, डिझेल दरवाढ झाली, तरुण बेरोजगार झाले, शेतकरी हवालदील आहेत. ऑक्‍सीजनअभावी लोकांचा जीव गेला. असे असतानाही जनतेचे प्रश्‍न सोडविण्यापेक्षा कॉंग्रेस पक्षावर (Congress Party) आरोप करण्याचाच भाजपचा अजेंडा आहे. भाजप हा पुणे, पिंपरी-चिंचवडपासून ते दिल्लीपर्यंत भ्रष्टाचाराचा केंद्र आहे.' अशा शब्दात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शुक्रवारी भाजपवर निशाणा साधला.

सद्‌भावना यात्रेनिमित्त पुणे दौऱ्यावर आलेल्या पटोले यांनी शुक्रवारी कॉंग्रेस भवनाला भेट दिली. यावेळी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही कार्यकर्त्यांनी पटोले यांच्या उपस्थितीत पक्षामध्ये प्रवेश केला. तसेच स्वातंत्र्यदिनी आफ्रिकेतील किलीमांजारो हे उंच शिखर सर करणाऱ्या धनकवडीतील स्मीता फुगे या तरुणीला कॉंग्रेस पक्षातर्फे एक लाख रुपये देऊन यावेळी तिचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पटोले यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला.

पटोले म्हणाले, 'नाशिकमध्ये ऑक्‍सीजनअभावी एकाचा मृत्यु झाला, तिथे भाजपची सत्ता आहे. पिंपरी-चिंचवडमधील लाचखोरी प्रकरण असो किंवा पुणे महापालिकेच्या ऍमेनीटीच्या जागा विकण्याचे काम असो, भाजप हा भ्रष्टाचाराचा केंद्र आहे. पंतप्रधान निधीसाठी जनतेकडून पैसे गोळा करायचे आणि हिशेब देत नाही, हे सर्वात मोठे भ्रष्टाचाराचे उदाहरण आहे. स्विस बॅंकेत तिनशे पट रक्कम वाढली, आमच्या वेळी पेक्षा ही रक्कम कितीतरी अधिक आहे. त्यामुळे गल्ली ते दिल्ली फक्त भ्रष्टाचार बोकाळला आहे. भ्रष्टयाचाराची मर्यादा ओलांडणारा हा पक्ष आहे. ऑनलाईन' असणाऱ्या भाजपला नागरीकच आता "ऑनलाईन ठेवतील. ते आता सत्तेची गुर्मी दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत.''

फडणवीसांच्या काळातच कोरेगाव भीमा प्रकरण घडले, पहाटे फडणवीस सरकार बदलल्यानंतर दुपारी या प्रकरणाचा तपास "एनआयए'कडे गेला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या प्रकरणातील आरोपी अजून सापडलेले नाहीत. केंद्राकडून राज्यात हस्तक्षेप वाढला आहे, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

पटोले यांचा शुक्रवारी पुणे दौरा होता. त्यामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात कॉंग्रेसच्या इच्छुक कार्यकर्त्यांकडून आगामी महापालिका निवडणुकीसाठी आत्तापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात करण्यात आली.इच्छुकांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवर पटोले यांच्या स्वागतासाठी जोरदार फ्लेक्‍सबाजी केली होती. तसेच कॉंग्रेस भवनामध्येही काही जणांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करीत घोषणाबाजी केली जात होती.

पटोले म्हणाले....

- निवडणुकीची तयारी व पक्षाचा संघटनात्मक ढाचा मजबुत करण्यावर भर

- राज ठाकरे हे अलंकारिक भाषेत बोलतात, ते काय बोलले हे कळले तर सांगेन.

- आशिर्वाद यात्रा डिझेल, पेट्रोलची "डबल सेंच्युरी' करण्यासाठी.

- यासाठी देश वाचवण्यासाठी सोनिया गांधी यांनी प्रयत्न सुरू आहेत.

- जनतेचे प्रश्न सोडून अन्यत्र लक्ष वळवण्यासाठी धार्मिक रंग देण्याचे काम

- देशात कॉंग्रेस असेपर्यंत शांतता होती, लोकांना कळतेय खरे तालीबानी कोण ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यरात्री ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात! 4 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी, धक्कादायक व्हिडिओ समोर

मतदारांच्या फायद्याची बातमी! पत्ता बदलण्यासाठी ‘अर्ज क्र.8’ तर यादीत नाव समाविष्टसाठी भरावा लागतो अर्ज क्र. 6; ‘या’ संकेतस्थळावर आजच भरा अर्ज

Salman Khan house firing case: सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या मृत्यूचा कोर्टाने मागवला अहवाल; पोलीस कोठडीत संपवलं होतं जीवन

Latest Marathi News Live Update : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची धडाडणार तोफ; इंडिया आघाडीचे नेते राहणार उपस्थित

National Dengue Day 2024 : डेंग्यूचे डास जवळपास फिरकणार ही नाहीत, फक्त तुमच्या दिनचर्येत करा 'हे' बदल

SCROLL FOR NEXT