Narendra-Dabholkar
Narendra-Dabholkar 
पुणे

कळसकरनेच पहिली गोळी झाडली

सकाळवृत्तसेवा

पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर शरद कळसकर यानेच पहिली गोळी झाडली. त्यानंतर कळसकरने या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी कर्वेनगर येथे सोडली. त्या वेळी अमोल काळे हा तेथे उपस्थित होता, अशी माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण पथकाला (सीबीआय) शनिवारी (ता. ८) कळसकर याला घटनास्थळी तपासासाठी आणल्यानंतर मिळाली.

डॉ. दाभोलकर यांच्या खून प्रकरणात सीबीआयने सचिन अंदुरे व शरद कळसकर या दोघांना ताब्यात घेतले आहे. नालासोपारा स्फोटकप्रकरणी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शरद कळसकरला अटक केली होती. त्याच्या माहितीवरूनच सीबीआयने सचिन अंदुरे यास औरंगाबाद येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यास न्यायालयासमोर हजर केले. दरम्यान, एटीएसच्या ताब्यात असलेल्या कळसकर यालाही सीबीआयने सोमवारी आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर त्यास मंगळवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यास १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली होती.

दरम्यान, सीबीआयने ३१ ऑगस्ट रोजी दुपारी पावणेतीन वाजता दाभोलकरांचा खून झालेल्या शिंदे पुलावरील घटनास्थळी अंदुरे यास आणून घटनास्थळी तपास केला. त्यानंतर आज, शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सीबीआयच्या पथकाने कळसकर यालाही घटनास्थळाच्या ठिकाणी तपास करण्यासाठी आणले होते. तत्पूर्वी पथकाने कळसकर यास शिवाजीनगर, शनिवारवाडा, शनिवार पेठ, देवी हाइट्‌स, डेक्कन जिमखाना आणि त्यानंतर कर्वेनगर येथे फिरविले. या वेळी कळसकरने सीबीआय पथकाला दाभोलकर यांच्यावर पहिली गोळी आपणच झाडल्याची माहिती दिली. त्या वेळी अंदुरे त्याच्यासमवेत होता. घटना घडल्यानंतर कळसकर व अंदुरे हे दोघेही कर्वेनगर येथे गेले. त्या वेळी अमोल काळे हा तेथे उपस्थित होता, अशीही माहिती त्याने दिली. दरम्यान, कळसकर याला घेऊन सीबीआयचे पथक दिवसभर शहरामध्ये फिरत होते. या तपासामध्ये डॉ. दाभोलकर यांचा खून करून पुन्हा पलायन करण्यापर्यंतची इत्थंभूत माहिती कळसकरने पथकास दिली. दरम्यान, याबाबत स्थानिक पोलिस अनभिज्ञ होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT