narveer subhedar tanaji malusare sakal
पुणे

Khadakwasla News : भक्ती- शक्तीतून नरवीरांच्या कर्तृत्वाचा जागर; पारंपरिक जागरण गोंधळात बेल भंडाऱ्याची उधळण

नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या‌ पुण्यतिथी निमित्ताने सिंहगडाच्या कोळीवाडा श्री अमृतेश्वराच्या मेटावर जागरण गोंधळात 'बेल भंडारा' उधळून नरवीरांच्या शौर्याच्या शक्तीचा जागर सुरू होता.

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला - नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या‌ पुण्यतिथी निमित्ताने सोमवारी रात्री सिंहगडाच्या कोळीवाडा श्री अमृतेश्वराच्या मेटावर जागरण गोंधळात 'बेल भंडारा' उधळून नरवीरांच्या शौर्याच्या शक्तीचा जागर सुरू होता. तर गडावरील समाधी स्मारकासमोर भजनातून भक्तीचा जागर करण्यात आला.

यंदा प्रथमच उत्तमनगर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज सेवा भजनी मंडळाच्या वतीने समाधी स्मारकासमोर सांप्रदायिक भजनाने भक्तीचा जागर केला. रात्री नऊ ते मध्यरात्री एक वाजेपर्यंत भजन रंगले होते. यामध्ये २९ जणांचा समूह सहभागी झाला होता. यावेळी, संत तुकाराम महाराज यांचा, याजसाठी केला होता अट्टाहास । शेवटचा दिस गोड व्हावा ॥ आतां निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥ या अभंगाने नरवीरांची स्वराज्य प्रति असणारी निष्ठा या भावनेला उजाळा मिळाला.

सिंहगडचा रणसंग्राम होण्यापूर्वी कोळी वाड्यावर घेरे- सरनाईक खंडोजी नाईकांकडून नरवीरांनी गडाची माहिती घेतली. त्यासाठी श्री अमृतेश्वराच्या मेटावर गोंधळ्याच्या वेशात येऊन जागरण गोंधळ केला होता. म्हणून दरवर्षी माघ वद्य अष्टमीच्या रात्री‌ जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्याचे आयोजन दुर्गदरा येथील पंचमुखी मारुती मित्र मंडळ, आणि ग्रामस्थ, खंडोजी नाईक कोळी- जोरकर यांचे वंशजांनी आयोजन केले होते. जागरण गोंधळात मध्यरात्री बारा वाजता हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचा जयघोष करीत बेल भंडारा उधळला. नरवीरांच्या शौर्याच्या शक्तीचा जागर केला.

भानुदास जोरकर, गणेश वारूंडे, हरी जोरकर, नितीन वारुडे, श्रीकांत लांघी, संदीप जोरकर, माजी सरपंच दत्ता जोरकर, सागर जोरकर, अनिल जोरकर, अजय डोंगरे, आदित्य जोरकर आदींनी कार्यक्रमासाठी पुढाकार होता. यासाठी उद्योजक उदयसिंह शिंदे, पीएमआरडीए’चे संचालक रमेश कोंडे यांचे विशेष सहकार्य केले.

अष्टमीच्या रात्री डोणागिरी कड्याने गडावर येण्याची परंपरा सिंहगड पावित्र्य मोहिमेच्या वतीने सुरु केली आहे. सिंहगड पावित्र्य मोहिम व कोंढवे धावडे येथील शिव भ्रमंती यांच्या वतीने सुनीत लिंबोरे, प्रवीण पोकळे, अश्विन पित्रोडा, संतोष मालुसरे, अक्षय धोंडगे, राजवीर पोकळे, आदित्य कापसे, समाधी स्मारकाला दरवर्षी प्रमाणे फुलांची सजावट केली होती.

इतिहास अभ्यासक अशोक सरपाटील, हिंदू युवा प्रबोधिनी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बेंद्रे, विश्वास महाराज कळमकर, गणेश जाधव, हनुमंत जांभुळकर, नितीन चव्हाण- पाटील, शुभम् चांदेरे, गड किल्ले संवर्धन संस्थेचे साई जोशी आणि पदाधिकारी यांनी जागरण गोंधळाला उपस्थिती लावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: पुढील तीन दिवस महत्त्वाचे! मुसळधारेसह भरतीचा इशारा; हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Vanjari Reservation: मराठा आरक्षणासारखा वंजारी समाजाचा प्रश्न सुटणार का? ST मध्ये असल्याचा महत्त्वाचा पुरावा सापडला

MLA Rohit Pawar: सर्वसामान्यांना त्रास दिल्यास गय नाही: आमदार रोहित पवार; आपण जनसेवक आहोत विसरु नका, तीन हजार परत करायला लावले

Dermatitis Spread: 'साेलापूर शहरात टिनिया, कॅन्डिडासह त्वचेच्या विकारांत होतेय वाढ'; शहरात अतिवृष्टी, घाण पाणी अन् ओलाव्याचा परिणाम

Viral Restaurant Video : मुलांनी रेस्टॉरंटमध्ये केली 'ही' चूक, पालकांना भरावा लागला २.७१ कोटींचा दंड, नेमकं काय घडलं ?

SCROLL FOR NEXT