Naseeruddin Shaha nominated for Tanvir Award
Naseeruddin Shaha nominated for Tanvir Award 
पुणे

तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार नसीरूद्दीन शाहांना जाहीर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रूपवेध प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा यंदाचा तन्वीर सन्मान नसीरुद्दीन शाह आणि तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार पुण्यातील महाराष्ट्र कल्चरल सेंटरला जाहीर करण्यात आला आहे. येत्या 9 डिसेंबरला कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी साडेसहा वाजता हा सन्मान ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानच्या कार्यवाह दीपा लागू यांनी दिली. 

तन्वीर हा डॉ. श्रीराम लागू आणि दीपा लागू यांचा मुलगा. त्याचे एका अपघातत निधन झाले. त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ हे पुरस्कार प्रदान केले जातात. भारतीय रंगभूमीच्या प्रवाहात महत्त्वपूर्ण आणि भरीव कामगिरी केलेल्या रंगधर्मींना तन्वीर सन्मान आणि तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार हा नवीन पिढीतील आश्‍वासन आणि सातत्याने काम करणाऱ्या कलावंताना दिला जातो. यावर्षी या पुरस्कारांना शाह आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर या संस्थेची निवड करण्यात आली आहे. यंदा पुरस्काराचे पंधरावे वर्षे आहे. 
शाह हे चित्रपट आणि रंगभूमीवर अनेक वर्षे कार्यरत आहेत. कालसुसंगत, नव्या जाणिवांची इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भोषतील नाटके ते सादर करतात. महाराष्ट्र क्‍लचर सेंटर ही 25 वर्षांपासून अधिक काळ प्रायोगिक रंगभूमीसाठी काम करते. सुदर्शन रंगमंच आणि ज्योत्स्ना भोळे सभागृह ही दोन सभागृहे कलाकारांसाठी उपलब्ध असतात. नाटकांबरोबरच संगीत, नृत्य, चित्रकला आदी उपक्रम केले जातात. 

दीपा लागू यांनी सांगितले, की पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात रत्ना पाठक शाह या नसीरूद्दीन यांच्याबद्दल बोलणार आहेत. तसेच नसीरूद्दीन स्वत:ही त्यांच्या रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील प्रवासाबद्दल बोलणार आहेत. पुरस्काराचे यंदा पंधरावे वर्ष आहे. यापूर्वी अल्काझी, भालचंद्र पेंढारकर, विजय तेंडुलकर, दुबे, गो. पु. देशपांडे विजया मेहता यांच्यासह तेरा रंगधर्मींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT