Late-Kare
Late-Kare 
पुणे

बारामतीकर लता करे यांच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार

मिलिंद संगई

बारामती - एका अतिसामान्य कुटुंबात कष्ट करुन प्रपंच करणा-या माझ्या सारख्या एका महिलेला मानसन्मान मिळेल, माझ्यावर एक चित्रपट निघेल आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळेल, याची मी कल्पनाही केली नव्हती, माझ्यासाठी हे सगळे स्वप्नवतच आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लता भगवान करे - एक संघर्षगाथा..... या चित्रपटास काल राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला. मूळच्या बारामतीच्या आणि ज्येष्ठत्व येऊनही पतीच्या आजारावरील औषधोपचारासाठी अनवाणी धावून मॅरेथॉन जिंकणा-या लता करे भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिध्दी पावल्या. त्यांच्यावर एक चित्रपट करावासा वाटून तो होतो काय आणि त्याला थेट राष्ट्रीय पुरस्कार मिळतो काय... हे सगळेच एखाद्या चित्रपटाच्या कथानकात घडते तसेच घडले. 

आज लता करे यांच्याशी बातचीत केल्यानंतर त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. प्रसिध्दी व मानसन्मान मिळूनही आजही लता करे यांचे पाय जमिनीवरच आहेत आणि त्या मूळ जीवन जगत आहेत याचा आवर्जून उल्लेख करायला हवा. अत्यंत संघर्षात जीवन जगणा-या मूळच्या बुलढाण्याच्या व नंतर बारामतीतच जीवनप्रवास सुरु ठेवणा-या लता करे यांचा जीवनप्रवास हा अनेक महिलांप्रमाणेच खाचखळग्यांचाच होता.

पती आजारी पडल्यावर एका मॅरेथॉनची जाहिरात वाचनात आल्यावर त्यातील बक्षीसाच्या रकमेने आपण पतीवर उपचार करु असे वाटून, त्या मॅरेथॉन धावल्या. अनवाणी आणि नऊवारी लुगडे नेसून धावणा-या लताबाईंची दखल प्रसिध्दीमाध्यमांनी घेतल्यानंतर रातोरात त्या स्टार बनल्या. त्यांची कहाणी ऐकून नवीन देशबोनाई यांनी त्यांच्यावर चित्रपट करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात खुद्द लताबाईंनीच  भूमिका करावी असा आग्रह धरला. 

अभिनयाची काहीही माहिती नसणा-या लताबाईंनी मॅरेथॉनमधील जिद्दीप्रमाणेच अभिनयातही काहीतरी करुन दाखवू या उर्मीने हो म्हटले आणि त्यांच्यावरचा चित्रपट त्यांनीच भूमिका साकारुन पूर्णही केला. यातही पती भगवान करे व मुलगा सुनील करे यांनीही छोट्या भूमिका साकारल्या. 

जिद्द असेल व ध्येयप्राप्तीची इच्छा असेल तर काहीही घडू शकते हे लता करे यांनी या चित्रपटात भूमिका साकारुन सिध्द केले. स्वजीवनावरील या चित्रपटात भूमिका साकारल्यानंतर त्याला थेट राष्ट्रीय पुरस्कार मिळेल याची त्यांनीही कल्पना केली नव्हती पण जे काही करु ते मनापासून करु या भावनेतून त्यांनी पडदयावर स्वताःचीच भूमिका साकारली. 

बारामतीकरांसाठी आनंदाचा दिवस....
बारामतीकर लता करे यांच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, बारामतीकर अभिनेते अशोक समर्थ यांची भूमिका असलेल्या बार्डो या चित्रपटासही राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला तर बारामतीकर असलेल्या प्रदीप कोथमिरे यांनाही एका मालिकेतील अभिनयाबद्दल पारितोषिक मिळाले, असा तीन बारामतीकरांचा सन्मान झाल्याने बारामतीकरांसाठी हा एक आनंदाचा दिवस ठरला. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

Anil Navgane Attack: ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, भरत गोगावलेंच्या पुत्रासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

Gautam Adani: कोण आहेत गौतम अदानींचे राईट हँड? डॉक्टर ते उद्योगपती असा आहे प्रवास; चालवतात 20,852 कोटींची कंपनी

SCROLL FOR NEXT