Education Sakal
पुणे

एनसीटीईमार्फत ‘नॅशनल मिशन फॉर मेन्टरिंग’ अभियान लवकरच होणार कार्यान्वित

शिक्षणातील गुणवत्ता वाढविण्याच्या हेतूने सक्षम मार्गदर्शक घडविण्यासाठी देशात लवकरच राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेतर्फे (एनसीटीई) ‘नॅशनल मिशन फॉर मेन्टॉरिंग’ अभियान कार्यान्वित करण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शिक्षणातील गुणवत्ता वाढविण्याच्या हेतूने सक्षम मार्गदर्शक घडविण्यासाठी देशात लवकरच राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेतर्फे (एनसीटीई) ‘नॅशनल मिशन फॉर मेन्टॉरिंग’ अभियान कार्यान्वित करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मार्गदर्शक सूचनांचा मसुदा तयार केला आहे. देशपातळीवर अभियान राबविण्यासाठी लवकरच अंतिम मसुदा तयार केला जाणार आहे.

एनसीटीईतर्फे ‘नॅशनल मिशन फॉर मेन्टरिंग’ हे अभियान प्रस्तावित केले आहे. शाळा आणि महाविद्यालयांच्या पातळीवर हे अभियान राबविण्यासाठी ‘ब्ल्यू बुक फॉर मेन्टरिंग’ या नावाने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. प्राथमिक स्वरूपात असणाऱ्या या मार्गदर्शक सूचनांच्या मसुद्यावर हरकती, सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यावर आलेल्या हरकती, सूचनांचा विचार करून त्यानंतर मार्गदर्शक सूचनांचा अंतिम मुसदा तयार करून तो अभियानांतर्गत कार्यान्वित केला जाणार असल्याचे एनसीटीईने स्पष्ट केले आहे.

शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी आताच्या काळात नव्याने निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्याची गरज आहे. तसेच नव्या शैक्षणिक धोरणात शिक्षण क्षेत्राच्या रचनेत संपूर्ण बदल, वेगवेगळ्या स्तरावर मार्गदर्शन (मेन्टॉरिंग) प्रस्तावित केले आहे. त्यात विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठीही मार्गदर्शक तरतूद केली आहे. शिक्षकांचा आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे बदलत्या काळासह जुळवून घेण्यासाठी शिक्षकांमधील क्षमता, कौशल्य वाढविण्याची गरज लक्षात घेऊन त्यांना व्यावसायिक पद्धतीने मार्गदर्शन करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी विविध पद्धतींचा वापर करण्यासह ‘नॅशनल मेन्टरिंग इन्फ्रास्ट्रक्चर’ची निर्मिती करण्यात येईल. या अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांचा मसुदा एनसीटीईच्या ‘https://ncte.gov.in/’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुसदा जाहीर केल्यापासून तीस दिवसांत त्यावर हरकती-सूचना पाठविण्याचे आवाहन एनसीटीईने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नव्या मतदार नोंदणीसाठी महत्त्वाची बातमी! आता नोंदणीवेळी जुळवावी लागणार २४ वर्षांपूर्वीची वंशावळ; प्रशासनाला शोध सोलापुरातील ६ लाख मतदारांचा, वाचा...

Riddhi Thakkar: ‘लेट्स एक्सप्लोर बस्तर...’ २० बाइकरचा ग्रुप, सफरीचं स्वप्न ठरलं अखेरचं, अचानक काळाचा घाला; मुंबईच्या रिद्धीचा दुर्दैवी अंत

Khutbav Accident : नियतीचा खेळ, मृत्यूतही साधला मेळ; रक्षाबंधनापूर्वी बहीण-भावावर काळाचा घाला, पारगावात हळहळ

Talegaon Dabhade News : रस्ता नसल्याने ज्येष्ठाला उपचारासाठी झोळीतून नेण्याची वेळ

मोठी बातमी! मराठा समाजातील १.८१ लाख तरुण रोजगार मागणारे नव्हे रोजगार देणारे; ७ वर्षांत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून १८७४ कोटी

SCROLL FOR NEXT