Naturopathic.jpg
Naturopathic.jpg 
पुणे

महत्त्वाची बातमी : आंबेगावात घेता येणार निसर्गोपचार पद्धतीने उपचार 

चंद्रकांत घोडेकर

घोडेगाव (पुणे) : गोहे बुद्रूक (ता. आंबेगाव) येथील आदिवासी आश्रमशाळेच्या जुन्या इमारतीत केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालय व राष्ट्रीय निसर्ग उपचार संस्था यांच्या वतीने निसर्गोपचार रुग्णालय सुरु केले आहे. या रुग्णालयात निसर्गोपचार पद्धतीने उपचार केले जाणार असल्याचे येथील निवासी वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. शिवकेश कुमारसिंग यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गोहे बुद्रूक येथे एकात्मिक आदिवासी विभागाची आश्रमशाळा असून, या इमारतीला डागडुजी व इतर ठिकाणी ४७ लाख रुपये खर्च करून निसर्गोपचार रुग्णालयात रूपांतर केले आहे. या निसर्गोपचार केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी (ता. २) आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. हे रुग्णालय पुणे येथील राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था चालवणार आहेत. २० बेडची सोय असलेले हे रुग्णालय येथील आदिवासी व सर्वसामान्य नागरिकांना उपयोगाचे ठरणार आहे. संपूर्ण निसर्गोपचार पद्धतीने रुग्णांवर उपचार केले जाणार आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 

 

या निसर्गोपचार रुग्णालयात नागरिक सशक्त राहण्यासाठी माती, पाणी, वायु, सूर्यप्रकाश व आकाश या पंचमहाभूतांद्वारे आरोग्याचे ज्ञान दिले जाणार आहे. येथे नैसर्गिक औषधांचाही अभ्यास केला जाणार आहे. येथे दाखल झालेल्या रुग्णांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नसून, त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा येथे पुरविल्या जाणार आहेत. सध्या येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामकाज करण्यास अडथळा येत आहे. परंतु, लवकरच सर्व प्रकारची काळजी घेऊन येथे ही उपचार पद्धती सुरु केली जाणार आहे. 
- डॉ. शिवकेश कुमारसिंग

या आहेत सुविधा 
निसर्गोपचार पद्धतीने उपचार, योग कक्ष, पुरुष व स्त्री स्वतंत्र कक्ष, पुरुष व स्त्री उपचार कक्ष, सल्लामसलत कक्ष, थेरपी कक्ष, आहार केंद्र, २० बेडची सोय. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT