NCP Ajit Pawar On koyata gang in pune police denied claims about koyata gang  Esakal
पुणे

Koyata Gang Pune : "पुण्यात कोयता गँग नाही", पुणे पोलिसांची गृहमंत्र्यांना चुकीची माहिती? अजितदादा नक्की काय म्हणाले?

सकाळ डिजिटल टीम

पुणे : शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून कोयता घेऊन फिरणाऱ्या तरुणांची दहशत पाहायला मिळत आहे. यादरम्यान पुणे शहरात कोयता गँग नसल्याची माहिती पोलिस आणि गृहमंत्र्यांनी दिल्याचे अजित पवार यांनी याबद्दल पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मागील काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गँगने उच्छाद मांडला असून यासंबधीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. हातात कोयता घेऊन तरुणांची टोळकं दहशत माजवत असल्याचेही यापूर्वी उघडकीस आले होते. या घटनेचे अनेक सीसीटीव्ही फुटेज देखील वायरल झाले आहेत.

दरम्यान या मुद्द्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, मला पोलिसांनी आणि गृहमंत्री यांनी देखील याबद्दल सांगितले आहे. त्यांचे म्हणणे आहे की या गोष्टीला मीडिया खूप वर उचलत आहे. पोलिस म्हणत आहेत कोयता गँग म्हणण्याचे कारण नाही. कारण जिथे प्रकार घडले तर तिथे तडीपार मोका लावला जातो आहे. काही भागात असे आहे असे पोलिसांनी सांगितले आहे. एखाद्याने जर कोयता काढला की त्याला गँग म्हटलं जातं आहे असे पोलिस सांगत आहे

या नंतर पुणे शहरात कोयता घेऊन दहशत माजवली जात नाही अशी चुकीची माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी गृहमंत्र्यांना का दिली? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Rain Forecast : गुड न्यूज! महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक हवामान; गणेशोत्सव काळात जोरदार पावसाचा अंदाज

Amruta Fadnavis: गरबा सर्वसमावेशक उत्सव; मुस्लिमांच्या प्रवेशाला विरोध का? अमृता फडणवीस यांची भूमिका

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

SCROLL FOR NEXT