postar-viral-in-pune.jpg 
पुणे

पुण्यात पोस्टर व्हायरल; काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेना एकसाथ?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : एकीकडे सत्तेचा तिढा झालेला असताना पुण्यात व्हायरल झालेल्या पोस्टरमुळे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी एकसाथ आहेत का अशी चर्चा पुुणेकरांमध्ये सुरु आहे. कोंढव्यात ज्योती हॉटेल चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनिस सुंडके यांनी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो असलेला फ्लेक्स लावला आहे. या फ्लेक्सची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून चौदा दिवस झाले तरी अद्याप सत्ता स्थापन झाले नाही. यात शिवसेनेने सत्तेत समान वाटा मिळावा अशी मागणी लावून धरली आहे. यावरून चांगलेच राजकारण तापले असताना या फ्लेक्समुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. 

रोज नवनवीन राजकीय घडामोडी घडत असताना कोंढवा परिसरातील या फ्लेक्समध्ये सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो लावला आला आहे. 

त्यावर ''महाराष्ट्राच्या जनतेने, महाराष्ट्रातील पावरबाज जनतेने, संघर्षातील आदेश स्विकारला आहे…! बळीराजाच्या मनातील अन् हातातील घड्याळाच्या अचूक वेळेने, धनुष्यबाणातील अचूक वेधाने जनता राजा स्वीकारावा' हा मजकूर लिहिलेला आहे, यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

 एकमेकांचे विरोधक असलेल्या नेत्यांचे एकाच फ्लेक्सवर फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे या फ्लेक्सची सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrakant Patil : कोल्हापुरात प्रत्येक मंगळवारी भाजपमध्ये एकाचा प्रवेश होणार, चंद्रकांत दादांची भविष्यवाणी

रावसाहेब दानवेंच्या सांगण्यावरून व्यवहार केला, पण त्यांच्या नातवानं फसवलं; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 70 टक्के ग्राम पंचायतीवर प्रशासकराजची शक्यता

UAE Military : यूएई लष्कराच्या शिष्टमंडळाची एएफएमसीला भेट; आरोग्यसेवेत एआय आणि एमएलच्या वापरावर चर्चा

'माझ्याशी लग्न करशील?' शाहरुखने लग्नाच्या 15 वर्षानंतर प्रियंका चोप्राला लग्नासाठी घातलेली मागणी, प्रपोजल ऐकून थक्क झाली प्रियंका

SCROLL FOR NEXT