पुणे

अधिकृत होर्डिंगवरच राष्ट्रवादीचा "हल्लाबोल' 

सकाळवृत्तसेवा

पुणे -महापालिका निवडणुकीतील विजयानंतर भाजपने केलेल्या "फ्लेक्‍स' अतिक्रमणाची री राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही ओढली आहे. "हल्लाबोल' आंदोलनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसने साडेतीनशे अधिकृत होर्डिंगवरच अतिक्रमण केल्याची बाब समोर आली आहे. पुणे आउटडोअर ऍडव्हर्टाइज असोसिएशनने याला आक्षेप घेत, अतिक्रमण करणाऱ्या राजकीय पक्षाचे नेते व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही केली आहे. 

राजकीय पक्षांच्या मोठ्या सभा-कार्यक्रम, वाढदिवस-जयंती-पुण्यतिथी अशा कार्यक्रमानिमित्त शहरभरात मोठ्या प्रमाणात "फ्लेक्‍सबाजी' केली जाते. महापालिकेचे पैसे भरून घेतलेले होर्डिंग, दिशादर्शक फलक यावर सर्रास अतिक्रमण करून स्वतःचा फ्लेक्‍स लावला जातो. महापालिकेची बोथट भूमिका व राजकीय पक्ष तसेच स्थानिक गुंडांच्या दबावामुळे त्यावर कारवाई होत नाही. 

राज्य सरकारविरोधातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आंदोलनानिमित्त वारजे आणि वडगावशेरीत पक्षाच्या सभा झाल्या. या सभेच्या निमित्ताने विधानसभेच्या इच्छुकांनी आपापल्या मतदारसंघात "फ्लेक्‍सबाजी' करीत, शक्तिप्रदर्शनाची संधी साधून घेतली. पक्षाचे जुने-नवे कार्यकर्तेही मागे राहिले नाहीत. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सभेचे फलक कोथरूड, कर्वेनगर, वारजे, खडकवासला, कात्रज, धनकवडी, आंबेगाव परिसरातील रस्ते आणि चौकांत झळकत आहेत. खासगी जाहिरातदारांच्या "होर्डिंग'वरही सर्रास बेकायदा फलक लावले आहेत. वडगावशेरीतील सभेसाठी संपूर्ण पूर्व भागात म्हणजे हडपसर, नगर रस्ता, चंदननगर, खराडी, वडगावशेरीसह सर्वत्र फलकबाजी केल्याचे चित्र आहे. येथील "होर्डिंग'ही गेल्या आठ दिवसांपासून व्यापले आहेत. या आंदोलनामुळे महापालिकेच्या जाहिरातदारांचे नुकसान होत असून, आर्थिक फटका बसत असल्याची तक्रार "पुणे आउटडोअर ऍडव्हर्टाइज असोसिएशन'च्या पदाधिकाऱ्यांनी केली. 

शहरातील सतराशे अधिकृत होर्डिंगसाठी महापालिकेला वर्षाकाठी मोठे शुल्क भरावे लागते. राजकीय पक्षांचे पदाधिकारी कल्पना न देताच होर्डिंगवर फलक लावतात. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होतो. गेल्या आठ-दहा दिवसांत आंदोलनाचे अनेक फलक लागले. मात्र त्याचे शुल्क भरण्यात आलेले नाही. अशा प्रकारांमुळे जाहिरातीला अडचण येत आहे. 
- बाळासाहेब गांजवे, अध्यक्ष, पुणे आउटडोअर ऍडव्हर्टाइज असोसिएशन 

शहरातील बेकायदा फलक काढण्यात येतील. मात्र "होर्डिंग' अधिकृत जाहिरातदारांकडे असल्याने तेथे कारवाई करता येत नाही. रस्ते आणि चौकांमध्ये उभारलेल्या फलकांची पाहणी करून कार्यवाही केली जाईल. बेकायदा फलकप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
- तुषार दौंडकर, प्रमुख, आकाशचिन्ह व परवाना, महापालिका 

सभांचे नियोजन करताना फलक लावण्याबाबत पदाधिकारी-कार्यकर्त्यांना परवानगी घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार बहुतांश भागात अधिकृत होर्डिंग लावली आहेत. बेकायदा फलकांना आमचा विरोधच आहे. 
- चेतन तुपे, विरोधी पक्षनेते, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT