Ajit Pawar 
पुणे

अजित पवारांनी स्टेजवर बदलल्या नावाच्या पाट्या अन् शेजारी बसविले...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राजकीय वैर असलेले दोन प्रमुख नेते जेव्हा शेजारी-शेजारी बसतात तेव्हा याची चर्चा होणार हे निश्चित आहे. असेच काही आज (बुधवार) वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेत पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तर चक्क स्टेजवरील बसण्यापूर्वी नेम प्लेट बदलून हर्षवर्धन पाटील यांना शेजारी बसविले. 

वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा पुण्यात पार पडली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमात अजित पवार यांनी नेम प्लेट बदलून जागा बदलल्याने उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. 

अजित पवार यांनी व्यासपीठावर येताच शेजारी असलेल्या नावाची पाटी बदलून हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची पाटी शेजारी घेतली आणि त्यांना शेजारी बसवून घेतले. अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वांनाच माहीती आहे. तरिही त्यांच्याकडे झालेल्या चर्चेमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. नावाच्या पाट्या बघून नेते बसत असतानाच अजित पवार पुढे आले आणि त्यांनी नावाच्या पाट्या बघितल्या. त्यात हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये कल्लापाअण्णा आवाडे यांच्या नावाची पाटी होती. ती पाटील अजित पवार यांनी बदलून हर्षवर्धन पाटील यांची पाटी शेजारी घेतली आणि नंतर मागोमाग आलेल्या हर्षवर्धन पाटील यांना शेजारी बसवून घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, तरीही संघात एक बदल! भारताच्या Playing XI मध्ये कोणाची एन्ट्री?

AI Powered Cancer Diagnosis: तंबाखू, प्रदूषण की केमिकल? DNA पाहून कॅन्सरचं ‘खरं कारण’ शोधणार आता AI!

Hadapsar News : थायलंडमधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस अभिजीत आर्ट्सचे डायमंड वर्क

Pune Rain Update : पुढील दोन दिवस शहरात पावसाची उघडीप

पाकिस्तानने मदत नाकारली! सौदीने थेट इस्रायलकडे मागितला गुप्तचर यंत्रणेचा सपोर्ट; हुती बंडखोरांचा उद्रेक

SCROLL FOR NEXT