Ajit Pawar Sakal
पुणे

वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या होर्डिंगवर अजित पवारांचं उत्तर

कार्तिक पुजारी

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक ठिकाणी शुभेच्छा देणारे होर्डिंग लावण्यात आले आहेत. होर्डिंग न लावण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसकडून करुनही ते अनेक ठिकाणी लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले .

पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक ठिकाणी शुभेच्छा देणारे होर्डिंग लावण्यात आले आहेत. होर्डिंग न लावण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसकडून करुनही ते अनेक ठिकाणी लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले . या मुद्द्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, 'होर्डिंग लावण्यास मी सांगितले नव्हते. गुन्हेगार माझे होर्डिंग्स लावत असतील तर यात माझा काय दोष. आम्ही आवाहन करण्याचे काम केले होते. त्यामुळे कुणी चुकीचं काम केलं असेल तर पोलिसांनी कारवाई करावी. त्यांना कशाची बंदी नाही. मी अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये येतोय. त्यामुळे येथील नागरिकांना माझी मतं स्पष्टपणे माहिती आहेत. त्यामुळे कोणताही मुद्दा उपस्थित करणे योग्य नाही. मी नियमाचा पालन करणारा माणूस आहे. होर्डिंग चुकीचे लागले असतील, तर भाजपची येथे सत्ता आहे. भाजपने कारवाई करावी.'

अजित पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, 'देशातील जनता लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. याआधी अनेकजण लस घेण्यास घाबरत होते. पण, लोकांच्या मनातील शंका दूर झाल्या आहेत. त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे. ग्रामिण भागातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.'पिंपरी-चिंचवड येथे शिवसेना खासदार संजय राहुत आले होते. यावेळी त्यांनी 50 नगरसेवक निवडून येतील, असा दावा केला होता. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, कुठल्याही पक्षाचे नेते कार्यकर्यांना स्फुरण चढावं, ईर्षा निर्माण व्हावी यासाठी असे वक्तव्य करत असतात. भाजप, काँग्रेस, शिवसेना कोणीही कार्यकर्त्यांशी बोलताना असे वक्तव्य करु शकतात, असं ते म्हणाले.

दरम्यान, 22 जुलैला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादीने शहरात जोरदार बॅनरबाजी केलीये. येत्या सहा महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या असल्याने आपला नेता किती पावरफूल आहे हे दाखवण्यासाठी जणू स्पर्धा लागल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार यांच्या वाढदिवसाचे कॅम्पेन चालविण्यात आले. त्याची टॅगलाईन ''कारभारी लय भारी'' अशी आहे. तर भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं होर्डिंग कॅम्पेन केले त्याची टॅगलाईन ''नव्या पुण्याच्या विकासाचे शिल्पकार अशी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: इस्ट टू वेस्ट! वाहतूक कोंडीने मुंबईकर त्रस्त; रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Pune Rain Update : पुण्यात रात्रभर पावसाची संततधार, अनेक भागांत साचले पाणी; वाहतूक कोंडीने पुणेकर त्रस्त, वाहनांच्या लागल्या रांगा

Latest Marathi News Live Update : मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचे ढग; पुढील काही तास पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता

Tukaram Mundhe Crackdown : मुंढेंच्या दणक्याने हॉटेल्सही 'सरळ'! आधी सिलिंडर, आता 'एफडीए'मुळे मेन्यूमध्ये कपात; पनीर, चीज, खवा 'गायब'च

Koyna Rain: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; ५० मिमीहून अधिक पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT