NCP, MP Supriya Sule,  saswad party workers program
NCP, MP Supriya Sule, saswad party workers program 
पुणे

सासवडमध्ये खासदार सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी

सकाळ ऑनलाईन टीम

सासवड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गावपातळीपर्यंत पोचलेला पक्ष आहे. पक्ष सर्वांना बरोबर घेतो. त्यामुळे ग्रामपंचायत पातळीवर निवडुण आलेल्या सदस्यांचा सत्कार वा सन्मान करीत असताना.. पराभूत उमेदवारांनाही वाटचालीसाठी बळ दिले जाईल. सर्वांनी  मिळून पक्ष संघटना मजबूत करण्यास कामाला लागावे. पक्ष सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाही बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. 

पुरंदर तालुक्यातील नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सासवड (ता. पुरंदर) येथील जयदिप मंगल कार्यालयात झाला. त्यावेळी खासदार सुळे बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुक्यात नंबर एक असल्याचे दाखविणारी यावेळी मोठी गर्दी होती. कित्येकांना बसण्यास जागा मिळाली नाही, ते कार्यालयाबाहेर भाषणे एेकत होते. यावेळी जिल्हा नियोजन समितीवर राज्यशासनाने नियुक्त केलेले निवृत्ती बांदल, माणिक झेंडे यांचा विशेष सत्कार झाला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनाही  प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार झाला.  

यावेळी कार्यक्रमास पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुका अध्यक्ष माणिक झेंडे, माजी आमदार अशोक टेकवडे, माजी सनदी अधिकारी व नेते संभाजी झेंडे, जिल्हा बँकेचे संचालक प्रा. दिगंबर दुर्गाडे, सुदाम इंगळे, हेमंतकुमार माहूरकर, तात्या भिंताडे, पुष्कराज जाधव, भरत झांबरे, शिवाजी पोमण, राहुल गिरमे, बंडुकाका जगताप, बाळासाहेब भिंताडे, गौरी कुंजीर, ऋतुजा धुमाळ, पूजा भिंताडे आदी अनेक मान्यवर व गावोगावचे कार्यकर्ते उपस्थित होते.  

स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार कळावा, पंचायत राजच्या योजना, नव्या शासन योजना व एकुणच कामात मदत होण्यासाठी नूतन ग्रामपंचायत सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आपण पुढाकार घेत असल्याचेही सांगत खा. सुळे यानिमित्ताने म्हणाल्या., मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे राज्य सरकार उत्तम चालले आहे. पण पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रत्येकाला मुभा आहे. अजितदादांच्या जनता दरबारास रांगा लागतात, हे कशाचे धोतक आहे. समाजाला वेळ देणारा कार्यकर्ता गरजेचा असतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाची ताकत आणखी वाढवावी. लवकरच पुरंदर तालुक्यातही सरपंच, उपसरपंच निवडीनंतर गणनिहाय आढावा बैठका घेऊ.  यावेळी सर्वश्री टेकवडे, दुर्गाडे, झेंडे, माहूरकर, अजिंक्य टेकवडे, संभाजी कोलते, सौरभ कुंजीर, सोनाली खेडेकर, शेखर पिसे आदींनी मनोगत मांडले. कार्यक्रमात प्रस्ताविक माणिक झेंडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र देवकर यांनी आभार प्रदर्शन पुष्कराज जाधव यांनी केले. 

..अजून कोरोना गेलेला नाही : सुळे

मी विविध भागात फिरते. असे सांगताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मास्क न घालणारी लोक पाहीली की खंत वाटते. कोरोना योद्ध्यांनी एकीकडे मोलाचे काम केले अन् निष्काळजी लोक फिरतात. मी सांगते.. अजूनही कोरोना गेलेला नाही. सर्वांनी स्वतःची कुटुंबाची व समाजाची काळजी घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT