Pune Crime  Esakal
पुणे

Pune Crime : महिलेला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पुणे शहर उपाध्यक्षाला अटक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्ष दयानंद इरकल यांना अटक

सकाळ डिजिटल टीम

पुण्यात वकील महिलेला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्षाला अटक करण्यात आली आहे. वकील महिलेला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्ष दयानंद इरकल यांना अटक करण्यात आली आहे.

दयानंद इरकल यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या वकील युवतीला शिवीगाळ आणि स्पर्श करत मारहाण केल्याची घटना काल रात्री ही घडली होती. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात रात्री गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पुणे शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष दयानंद इरकल यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २५ वर्षे तरुणीने चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दयानंद इरकल यांच्यासह संध्या माने इरकल तसेच इतर दोन ते तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना काल रात्री पावणे ९ च्या सुमारास घडली.

तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी तरुणी ही काल रात्री पुण्यातील एस बी रोड वरुन पूना हॉस्पिटलच्या दिशेने तिच्या दुचाकी वरुन प्रवास करत होती. यावेळी तिच्या पुढे असलेल्या चार चाकी ( एम एच १२ डी डब्ल्यू ०००१) वाहनाला तिने हॉर्न दिला. हॉर्न वाजवल्यामुळे इरकल यांना राग आला आणि ते गाडीतून खाली उतरले. त्यांनी त्या तरुणीला विनयभंग केला तसेच गाडीत बसलेल्या संध्या माने इरकल यांनी त्या तरुणीच्या गालावर आणि गळ्यावर नखांनी बोचकरले तसेच हाताने आणि चापलेनी मारहाण केली. त्यांच्यासोबत असलेल्या इतर २ जणांनी देखील त्या तरुणीला मारहाण करत शिवीगाळ केली. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT