India president Draupadi Murmu sakal
पुणे

Dikshant Sohala : एनडीएच्या दीक्षान्त संचलन सोहळ्यासाठी पुण्यात राष्ट्रपतींची उपस्थिती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नोव्हेंबरच्या अखेरीस पुण्याला भेट देणार आहेत.

अक्षता पवार

पुणे - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नोव्हेंबरच्या अखेरीस पुण्याला भेट देणार आहेत. येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला(एएफएमसी) त्या भेट देणार आहेत. लष्कराच्या या दोन्ही संस्थांच्या कार्यक्रमात त्या सहभागी होणार आहेत.

यंदा एनडीएच्या १४५ व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा ३० नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. राष्ट्रपती मुर्मू या सशस्त्र दलाच्या सर्वोच्च कमांडर असून या संचलन सोहळ्यात उपस्थित राहून कॅडेट्सच्या वतीने मानवंदना स्वीकारतील. पुढील वर्षी जानेवारीमध्ये या प्रबोधिनीचे ७५ वर्षे पूर्ण होणार असून त्या निमित्ताने एनडीएच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

दरम्यान या प्रशिक्षण संस्थेने आजवर तिन्ही दलांना दर्जेदार अधिकारी पुरविण्याबरोबरच मित्र देशातील प्रशिक्षणार्थ्यांना देखील लष्करी प्रशिक्षण दिले आहे. तर आपल्या ७५ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीला साजरा करत असताना यंदाचा एनडीएचा हा दीक्षान्त संचलन सोहळा देखील अत्यंत खास राहणार आहे. या सोहळ्याबाबतची माहिती लष्करी जनसंपर्क कार्यालयाने अधिकृत ट्वीटद्वारे दिली आहे.

दरम्यान येथील वैद्यकीय प्रशिक्षण संस्था असलेली एएफएमसीने देखील आपल्या स्थापनेचा यंदा अमृत महोत्सवी वर्ष साजरा केला. त्या अनुषंगाने विविध कार्यक्रम पार पडले असून वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी एएफएमसीला ‘प्रेसिडेंट्स कलर अवॉर्ड’ने गौरविण्यात येणार आहे. त्या निमित्त एएफएमसीमध्ये येत्या १ डिसेंबर २०२३ ला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Scam: बिल्डिंग प्रकल्पात गुंतवणुकीच्या आमिषाने ३.०५ कोटींची फसवणूक; स्वाती आणि अक्षत नाईक यांच्यावर गुन्हा

Solapur News:'साेलापूर जिल्ह्यातील ४२८१ सातबारे झाले जिवंत'; महसूलच्या मोहिमेत मृतांची नावे कमी करून वारसांची नोंद

Mahadevi Elephant: अनंत अंबानीच्या लग्नात हत्तीण तीन दिवस एकाच ठिकाणी उभी... महादेवीचे देखील हाल होणार? पेटाकडे उत्तर आहे का?

Latest Marathi News Updates: कांदिवलीत डंपरची कारला जोरदार धडक; कुटुंब थोडक्यात बचावले

LPG Gas Price: सणासुदीत नागरिकांना दिलासा; गॅस सिलिंडर झाला स्वस्त, नवीन दर काय?

SCROLL FOR NEXT