Nearly 125 years after the plague that place in sasane nagar will used for the treatment of corona patients at pune 
पुणे

प्लेगनंतर सव्वाशे वर्षांनी पुण्यातली जागा कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी; वाचा इंटरेस्टिंग इतिहास

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यात धुमाकूळ घातलेल्या 'प्लेग'च्या साथीत रुग्णांच्या सोयीकरिता हडपसरमधील ससाणे माळावर (आताचे ससाणेनगर) उभारलेल्या हॉस्पिटलच्या जागेत आता कोरोना रुग्णांसाठी 'क्वॉरंटाइन सेंटर' (विलगीकरण कक्ष) सुरू होणार आहे. त्यासाठी ससाणे एज्युकेश ट्रस्ट आणि ससाणे पंचवाडा मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या इमारती तात्पुरत्या सव्रुपात महापालिकेच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. या ठिकाणी सुमारे दोनशेहून अधिक रुग्णांची सोय होऊ शकते. प्लेगनंतर जवळपास सव्वाशे वर्षांनी ही जागा

आणखी वाचा - महाराष्ट्रानं कोरोनाला केलंय क्लस्टरमध्ये बंदिस्त 

पुणे आणि परिसरात 1897 मध्ये पसरलेल्या प्लेगच्या साथीने हजारो जणांचा बळी घेतला; तेव्हाच अनेकजण आपला जीव वाचविण्यासाठी धडपडत होते. अशा रुग्णांना वाचविण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुढाकार घेते; ससाणे माळावर हॉस्पिटलची व्यवस्था केली. ज्यामुळे प्लेगबाधितांना आधार मिळाला. या साथीत स्वत: सावित्रीबाई रुग्णांची सेवा करीत होता. 


पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

पूर्वीच्या ससाणे माळावर आता ससाणेनगर उभारले आहे. ससाणे माळावरील जुन्या हॉस्पिटलच्या जागेतच गेल्या सहा वर्षांत ससाणे एज्युकेशन ट्रस्टची शाळा उभारण्यात आली आहे. शाळेच्या तीन इमारती असून, त्यात 53 खोल्या आहेत.

पुण्यात हॉटस्पॉट संदर्भात मोठा निर्णय; दहा ठिकाणची सर्व दुकाने होणार बंद

शहरात सध्या कोरोनाने थैमान घातले असून, त्याला आटोक्‍यात आणण्यासाठी शासकीय यंत्रणा झटत आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने नव्या रुग्णांना सामावून घेण्यासाठी खासगी हॉस्पिटलसह विविध ठिकाणी क्वॉरंटाइन सेंटर्स सुरू करण्यात येत आहे. सध्या दोन हजार रुग्ण आणि संशयितांसाठी अशा सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून आणखी काही भागांत क्वॉरंटाइन सेंटर्स उभारण्यात येत असून, त्यासाठी मूळच्या ससाणे माळावरची आणि नव्या ससाणेनगरमधील या शाळेच्या इमारती उपलब्ध करून देण्याचा निर्णय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. 

आणखी वाचा- भिगवण येथील १८ जणांची कोरोना टेस्ट

नगरसेवक योगेश ससाणे म्हणाले, ""पुणे शहराला सुरक्षित ठेवण्याची या जागेची परंपरा आहे. ती आताही कायम राहिली आहे. फ्लेगपाठोपाठ कोरोनाला रोखण्याच्या मोहिमेत संस्थेने पुढाकार घेतला आहे. येथील तिन्ही इमारती विलगीकरण कक्षासाठी देण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासनाशी चर्चा झाली आहे.''

आणखी वाचा- भिगवण येथील १८ जणांची कोरोना टेस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

आजचे राशिभविष्य - 19 सप्टेंबर 2025

अग्रलेख : डिजिटल अरेस्ट

AFG vs SL Live : श्रीलंकेचा 'कुशल' विजय! अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात; बांगलादेशला लागली लॉटरी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT