nitin gadkari1 
पुणे

केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज; नितीन गडकरींचे मत

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे- सुखी, समृद्ध, संपन्न, स्वावलंबी, शक्तिशाली आणि जगातील आर्थिक महासत्ता असणारा आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी भारतीय इतिहास, संस्कृती, वारसा आणि भक्ती मार्गांतून मिळालेले संस्कार विद्यार्थ्यांवर करून मूल्याध्याष्ठित पीढी घडविण्याची गरज आहे," असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (मएसो) शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलत होते. सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, उपाध्यक्ष यशवंत वाघमारे, प्रदीप नाईक, नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट. अभय क्षीरसागर, सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहसचिव सुधीर गाडे उपस्थित होते.

कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण दिलासादायक; जाणून घ्या पुणे विभागातील स्थिती

गडकरी म्हणाले, "शिक्षणावर होणार्‍या खर्चातून देशातील पिढी संस्कारीत करुन त्यातून व्यक्ति निर्माण करण्याचे कार्य शिक्षण संस्था करीत असतात. देशाचा विकास करायचा असला तर शिक्षण क्षेत्रात कुठल्या प्रयत्नांची आवश्यकता आहे, याबाबतचा जीवन दृष्टिकोन बाळगून भविष्याच्या निर्मितीसाठी देशाला ‘ऍप्रोप्रिएट व्हिजन’ देण्याचे मोठे कार्य महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने केले आहे." ते म्हणाले,"शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणातून समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण पोहोचवायचे आहे. केवळ एवढ्यावरच न थांबता सर्वांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, नाविन्यता, कौशल्य, संशोधन अशा सर्वच क्षेत्रांतील ज्ञान मिळविणे आवश्यक आहे. तसेच विकासाचा समतोल राखताना व्यक्ती संस्कारीत होऊन त्याचे जीवन परिपूर्ण व्हावे यासाठी मूल्याधिष्ठित शिक्षण आवश्यक आहे."

यावेळी गोखले म्हणाले, "शिक्षक आपल्या परीने विद्यार्थ्यांना ज्ञान देत असतात. त्याद्वारे दुसर्‍यांना घडवू शकू असे व्यक्तिमत्व निर्माण झाले पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यापेक्षा एक पायरी पुढे राहिले पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनी शिक्षण थांबवू नये. कायम शिकत राहिले पाहिजे." कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा तोरडमल यांनी केले. राजीव सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT