Neglecting RTO and police Numberless Dumper in pune city 
पुणे

नंबर न दिसणारे डंपर सुसाट; आरटीओ आणि पोलिसांचे दुर्लक्ष

सकाळवृत्तसेवा

वडगाव शेरी : नगर रस्त्यावर बहुतांशी सिमेंट मिक्सर आणि बांधकाम साहित्याच्या डंपरचे वाहन क्रमांक दिसत नाहीत तर मागील ब्रेक लाईट ही बंद असतात.  कारवाईकडे कानाडोळा झाल्याने नियम गुंढाळुन ठेवणाऱ्या अशा शेकडो डंपर चालकांवर पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाचा वचक नसल्याचे चित्र आहे. 


नगर रस्ता भागात विमाननगर, खराडी येथे अनेक मोठे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. परंतु बहुतांश ठिकाणी जड वाहना बाबत पाळावयाचे सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविण्यात आलेले आहेत. या बांधकाम प्रकल्प मधून बांधकाम साहित्य घेऊन ये जा करणाऱ्या डंपरची चाके मातीने माखलेले असतात. ती माती रस्त्यावर पसरते. बहुतांशी डंपरचे वाहन क्रमांक मागून दिसत नाहीत. तर डंपरच्या मागील ब्रेक लाईट बंद असलेल्या दिसून येतात. डंपर मधील मातीवर , डस्ट वर ताडपत्री झाकलेली नसते. डंपर चालक कोणतीही वेग मर्यादा पाळत नाहीत. डंपरच्या सुसाट वेगामुळे अपघाताच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

या सर्व प्रकाराकडे पोलिसांचा मात्र कानाडोळा होत आहे. चौकाचौकात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांसमोर वाहन क्रमांक न दिसणारे डंपर राजरोसपणे ये-जा करताना दिसतात. अनेक डंपरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल भरलेला असतो.

याविषयी विमाननगर येथील रहिवासी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वडगाव शेरी वाहतूक विभाग अध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे म्हणाले, ;'वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनांना होणारा दंड हा किरकोळ असतो. आरटीओ कडक कारवाई करू शकते. मात्र हे मोठे डंपर धनदांडग्यांची असल्यामुळे कारवाई टळते. त्याच वेळेस सामान्य माणसावर मात्र कारवाई होते. 

न्यू नगर रोड सिटीझन फोरमच्या अध्यक्षा आरती सोनग्रा म्हणाल्या, दुर्दैवाने अपघात झाला तर निघून जाणाऱ्या डंपरचा वाहन क्रमांक नागरिकांना दिसणार कसा. म्हणून नियम न पाळणार्‍या डंपरवर कारवाई करावी.  

विमानतळ पोलिस स्टेशनचे वाहतूक पोलीस निरीक्षक बी एन मोळे म्हणाले, नियम न पाळणार्‍या डंपर चालकांवर कारवाई करण्यात येईल. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रघुनाथ कन्हेरकर म्हणाले, नियम न पाळणार्‍या वाहनांवर कारवाई नियमित सुरू असते. 

धनंजय मुंडे Genuine माणूस, पक्ष योग्य निर्णय घेईल : रोहित पवार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT