jawaharlal neharu 
पुणे

इंदिराजींची स्वाक्षरी असलेला नेहरूंचा जीवनपट; पुण्यातील अवलियाचा छायाचित्रांचा स्मृतीसंग्रह

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे- देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जीवनपट उलगडणारा छायाचित्रांचा संग्रह एका पुणेकराने तयार केला आहे, ते ही 1964 मध्ये ! मूळचे व्यावसायिक असलेले संभाजी नामदेव मुजुमले यांनी नेहरूजींना श्रद्धांजली म्हणून वृत्तपत्रे, मासिके आणि पुस्तकांतील छायाचित्रांचे एकत्रीकरण केले आहे. त्यावर नेहरूजींच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित, पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचीही स्वाक्षरी आहे. 

देशाला स्वातंत्र्य मिळाले त्याचवर्षी मुजुमले यांचा जन्म झाला. स्वातंत्र्य सैनिक असलेले वडील नामदेव मुजुमले यांचा देशभक्तीचा वारसा त्यांना लाभला. तसेच स्वातंत्र्यानंतरची नेहरूजींच्या कारकिर्दीतला घोडदौड त्यांनी पाहिली. त्याचा मोठा प्रभाव त्यांच्या जीवनावर झाला आणि त्यांनी नेहरूजींचे छायाचित्र जमवायला सुरवात केली. वयाचे 73 वर्ष पूर्ण करणारे मुजुमले म्हणतात,""सुरवातीपासून मला प्रसिद्ध लोकांची छायाचित्रे जमविण्याच छंद होता. अगदी जॉन एफ केनडी, जॅकलीन केनडी, क्रुस्तो यांसारख्या तत्कालीन आंतरराष्ट्रीय नेत्यांचेही फोटो मी जमवले होते. पण मला नेहरुजींचे विशेष आकर्षण होते.'' 1964 मध्ये नेहरूजींचे निधन झाल्यावर त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी मी माझ्या परीने छायाचित्रांचा संग्रह केला आणि तत्कालीन मान्यवरांची स्वाक्षरी घेण्याचा प्रयत्न केला. एका लहान मुलाने केलेला हा संग्रह पाहून तेव्हा अनेकांनी कौतुक केल्याचे मुजुमले सांगतात. 

घ्या! शासकाने उभारला कुत्र्याचा सोन्याचा पुतळा; तिकडे जनता सोसतेय भुकेच्या कळा

स्मृती संग्रहाचे विशेषत-

1960 ते 65 दरम्यान मुजुमले यांनी नेहरूजींच्या छायाचित्रांचा संग्रह केला आहे. यासाठी त्यांनी मराठी वृत्तपत्रासह इंग्रजी वृत्तपत्र आणि नियतकालीकेही जमवली. त्यांच्या संग्रहात नेहरूजींच्या बालपणापासूनच क्रिकेट खेळण्यापर्यंतचे फोटो आहेत. त्यांनी त्यावेळी 130 पेक्षा अधिक चित्रे संकलित केली. त्यांचा अल्बम बनविला त्यानंतर त्याचे मित्र अशोक तिकोणे यांनी त्याची सजावट केल्याचे त्यांचा मुलगा सागर यांनी आम्हाला सांगितले. 

घरातील वृत्तपत्रे, मासिकांची थप्पी पाहून बरेच लोक आलोचना करत. पण मी माझा संकल्प पूर्ण केला. कालांतराने मी ते सर्व साहित्य एका जाणकार व्यक्तीकडे दिले. नेहरूजींच्या संग्रहावर इंदिराजींची स्वाक्षरी आहे. आता मला त्यांचे पणतू राहुल आणि प्रियांका गांधी यांची स्वाक्षरी मिळवायची आहे, असं संभाजी मुजुमले म्हणालेत.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT