Amitabh-Gupta
Amitabh-Gupta 
पुणे

पुण्याचे नवे ‘सीपी’ देणार पुणेकरांचे प्रश्‍न सोडविण्यावर भर

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुण्यात त्यांचे ‘आयआयटी कानपूर’चे अनेक सहकारी मित्र आहेत. पण पुण्याशी त्यांचा कधी थेट संबंध आला नाही. आता त्यांची पुण्यात पहिल्यांदाच नियुक्ती झाली आहे. तिही थेट पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणूनच. ही संधी मिळाली आहे, नवनियुक्त पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना. या संधीचे सोने करतानाच शहरातील गुन्हेगारी नियंत्रण, कायदा-सुव्यवस्था राखण्याबरोबरच पुणेकरांचे प्रश्‍न सोडविण्यावर भर देणार असल्याचे गुप्ता यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सहसा पूर्वी काम केलेल्या शहरातच पोलिस आयुक्त म्हणून काम करण्याची संधी किाही पोलिस अधिकाऱ्यांना मिळते. परंतु नवनियुक्त पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता हे मात्र त्यास अपवाद ठरले आहेत. आयआयटी कानपूर येथून बी.टेक. पूर्ण केल्यानंतर गुप्ता यांनी भारतीय पोलिस सेवेमध्ये कार्य करण्यास प्राधान्य दिले. ‘आयपीएस’ झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात पोलिस अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. परंतु पोलिस अधिकारी म्हणून त्यांचा पुण्याशी कधी संबंध आला नाही. राज्य सरकारच्या गृह विभागामध्ये प्रधान सचिव पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या गुप्ता यांचे पुण्याच्या पोलिस आयुक्त पदासाठीच्या स्पर्धेत नाव चर्चेत आले. त्यानंतर गुरुवारी रात्री गुप्ता यांची पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती केल्याचे गृह विभागाने अधिकृतरीत्या स्पष्ट झाले.

गुप्ता हे मूळचे उत्तर प्रदेशमधील लखनौचे आहेत. पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर गुप्ता रविवारी पुण्यात दाखल होत असून ते डॉ. के. वेंकटेशम यांच्याकडून पोलिस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. याविषयी ‘सकाळ’शी बोलताना गुप्ता म्हणाले, ‘‘पुणे शहरामध्ये गुन्हेगारी नियंत्रण व कायदा-सुव्यवस्था राखण्यास आपले प्राधान्य असणार आहे.

त्याचबरोबर पुणेकरांचे प्रश्‍न सोडविण्यावर आपला भर असेल. मी ‘आयआयटी कानपूर’चा विद्यार्थी आहे. त्यादृष्टीने तंत्रज्ञानाला सेवेमध्ये प्राधान्य देऊ. नागरिकांबरोबरच पोलिसांच्या कल्याणाचाही आपण विचार करणार आहोत.’’

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: केएल राहुलने जिंकला टॉस, लखनौ संघात मोठा बदल; जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT