पुणे

आसू - फलटण ला बास्केटबॉल स्पर्धा

CD

पाचगणीच्या न्यू ईरा हायस्कूलला विजेतेपद

‘बास्केटबॉल’मध्ये बाजी; अकलूजचा शिवरत्न क्लबही विजयी

आसू, ता. ८ : फलटण येथील जायंट्स ग्रुप व मुधोजी क्लबच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात झाल्या. १२ आणि १४ वर्षांखालील गटात पाचगणीच्या न्यू ईरा हायस्कूलच्या संघाने मुला-मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अकलूजच्या शिवरत्न क्लब संघाने विजय मिळवला.
फलटण येथे आयोजित केलेल्या बास्केटबॉल स्पर्धेत फलटण, पाचगणी, बारामती, अकलूज येथील संघांनी सहभाग घेतला होता. माजी नगरसेविका सुभद्राराजे नाईक- निंबाळकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी मुधोजी क्लबचे सदस्य महादेव माने, सुभाषराव जाधव, बास्केटबॉल प्रशिक्षक बाळासाहेब बाबर, जायंट्स ग्रुपचे युनिट डायरेक्टर प्रभाकर भोसले, फेडरेशन ऑफिसर शिरीष शहा, अध्यक्ष शामराव निकम, माजी अध्यक्ष दीपक दोशी उपस्थित होते.


स्पर्धेचा वयाेगटानुसार अनुक्रमे पहिले तीन क्रमांक असे : १२ वर्षांखालील गट मुले : न्यू ईरा हायस्कूल (पाचगणी), शारदानगर हायस्कूल (बारामती), मुधोजी क्लब (फलटण). मुली : न्यू ईरा हायस्कूल (पाचगणी), मुधोजी क्लब (फलटण). १४ वर्षांखालील गट मुले : न्यू ईरा हायस्कूल (पाचगणी), शिवरत्न बास्केटबॉल (अकलूज), शारदानगर हायस्कूल (बारामती). मुली : न्यू ईरा हायस्कूल (पाचगणी), मुधोजी क्लब (फलटण), शिवरत्न क्लब (अकलूज). १७ वर्षांखालील गट मुले : शिवरत्न क्लब (अकलूज), न्यू ईरा हायस्कूल (पाचगणी), मुधोजी क्लब (फलटण).
विजेत्या संघांना सुभद्राराजे नाईक- निंबाळकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी उदय शहा, विठ्ठलराव माने, धनाजीराव जाधव, प्रकाश मोरे, प्रदीप फडे, बाबासाहेब गंगावणे, सुरेश शिंदे धनाजीराव घोरपडे, हणमंतराव घनवट आदी जायंट्‌सचे सदस्य यांच्यासह प्रत्येक टीमचे प्रशिक्षक, शिक्षक, पालक उपस्थित होते. सुरुवातीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

B02467
फलटण : विजेत्या संघांना बक्षीस वितरण करताना सुभद्राराजे नाईक- निंबाळकर. त्या वेळी महादेव माने, सुभाषराव जाधव, शामराव निकम, प्रभाकर भोसले आदी.
....................................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Municipal Corporation : सासरचा वारसा अन् माहेरची साथ; मालेगावच्या 'महिलाराज' मागे दडलंय मातब्बर घराण्यांचं पाठबळ

PM Narendra Modi: भारत विश्वासार्ह भागीदार; मलेशिया दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

Forest Department: येलदरी स्मृतीवनाची गेली रया! कोट्यवधींचा प्रकल्प धुळीस; वनविभागाचे दुर्लक्ष

Latest Marathi News Live Update : मोहोळमधील ईव्हीएम प्रकरण गंभीर; दोषींवर कठोर कारवाईचे संकेत

Iran US Relations: अणुकार्यक्रमावर इराण-अमेरिकेत चर्चा; पहिल्या फेरीत संवाद पुढे नेण्यावर भर; आणखी बैठक होणार

SCROLL FOR NEXT