पुणे

पुणे : तालुक्‍यांचे नवे कारभारी ठरणार 31 डिसेंबरला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विधानसभा निवडणुकीमुळे सुमारे साडेतीन महिने लांबणीवर पडलेल्या तालुका पंचायत समित्यांच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यासाठी 31 डिसेंबर रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शुक्रवारी दिला. यामुळे चालू वर्षाच्या शेवटच्या दिवशी पंचायत समित्यांना नवे कारभारी मिळणार आहेत.

या निवडणुका घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पंचायत समितीनिहाय पीठासन अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या केल्या आहेत. यानुसार संबंधित पीठासन अधिकाऱ्यांनी पंचायत समित्यांच्या विशेष सर्वसाधारण सभेच्या नोटिसा शनिवारी (ता. 21) काढाव्यात, असेही या आदेशात नमूद करण्यात आले. त्यामुळे पदाधिकारी निवडी होणार की पुन्हा मुदतवाढ मिळणार, याबाबत असलेला संभ्रम आता दूर झाला आहे. 

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत शुक्रवारी संपली. पुणे जिल्ह्यात 13 पंचायत समित्या आहेत. यापैकी सात पंचायत समित्यांवर महिलाराज येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

Pimpri Raja Accident: पिंप्री राजा गणेश मिरवणुकीत बेकाबू ट्रेलर घुसला; दोघांचा मृत्यू, सात जखमी, गावावर शोककळा

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

SCROLL FOR NEXT