corp.jpg 
पुणे

पुणे महापालिकेकडून शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची नव्याने फेररचना

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेकडून शहरातील प्रतिबंधित क्षेत्राचे नव्याने फेररचना करण्यात आली आहे. त्यामध्ये शहरातील 66 भाग हे प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहेत. तसेच येथून पुढे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यास संपूर्ण परिसर सील न करता ती गल्ली, बोळ अथवा सोसायटी सील करण्यात येणार आहे. 

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश काढले आहेत. आजपासून त्यांची अंमलबजावणी शहरात लागू करण्यात आली आहे. यापूर्वी शहरात जे प्रतिबंधित क्षेत्र होती. त्यांची फेररचना करून नव्याने 66 परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. ते वगळून अन्य भागात असलेले अडथळे दूर करण्याचे आदेशही आयुक्तांनी पोलिसांना दिले आहेत.

नव्याने प्रतिबंधित क्षेत्रात नियमावलीतही बदल करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात गल्ली, चाळ, वसाहत अथवा इमारतीमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाच आढळल्यास संपूर्ण परिसर सील न करता तेवढाच भाग सील करावा, असेही आयुक्तांनी या आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, नवीन प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील ज्या ठिकाणी अद्याप अडथळे आहेत. ते अडथळे पोलिसांनी काढून तेथील रस्ते रहदारीसाठी खुले करावेत, असेही या आदेशात आयुक्तांनी म्हटले आहे. 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT