New species of algae found in Powai Lake Research done by Agharkar Institute Pune 
पुणे

'हा' फोटो कशाचा आहे ? ओळखा बरं !

सकाळवृत्तसेवा

पुणे : निसर्गात विविध प्रकारचे घटक असतात. परंतु यातील काही घटकांचाच अभ्यास पूर्ण होतो व त्याबाबतची माहिती शोधपत्रकांच्या माध्यमातून मांडण्यात येते. पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेच्या (एआरआई) तर्फे नुकतेच एका विशिष्ट प्रकारच्या दुर्मिळ आणि दुर्लक्षित असलेल्या 'डायटम' (एकपेशीय) शेवाळाचा शोध लावण्यात आला आहे. हे डायटम शेवाळ आशिया मध्ये पहिल्यांदाच आढळले आहे. तसेच मुंबई येथील सर्वाधिक प्रदूषित पवई तलावात ही प्रजाती असल्याचे संशोधनातून समजले. शेवाळ पर्यावरणातील ऑक्सिजन निर्मितीसाठी योगदान देतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेवाळातीलच एक प्रकार म्हणजे 'डायटम'. तर 'सुडोस्टॉरॉसिरॉपसिस जीयोकोलॅग्रम' असे या शेवाळाचे नाव असून या प्रकारचे शेवाळ अत्यंत दुर्मिळ आहेत. भारतात सापडलेला हा शेवाळ इतर देशांमध्ये असलेल्या प्रजातींच्या तुलनेत वेगळी आहे. तसेच आकार सुद्धा याला वेगळेपणा देते. अश्या या दुर्लक्षित प्रजातींचा अभ्यास करून याबाबतची संबंध माहिती मिळविण्याचे कार्य संस्थेतील वैज्ञानिकांनी केले आहे. अशी माहिती संशोधनाचे प्रमुख डॉ. बी कार्तिक यांनी दिली.


"अश्या दुर्मिळ व दुर्लक्षित प्रकारचे शेवाळ काही ठराविक प्रकारच्या जागेत आढळतात. मुंबई येथील पवई तलाव हे सर्वात प्रदूषित तलाव आहे. परंतु तलावात हे विशिष्ट प्रकारचे शेवाळ आढळतील याची कल्पना नव्हती. संशोधकांनी पर्यावरणातील अश्या दुर्लक्षित प्रजात्यांचा अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे अश्या प्रकारच्या नवीन जीवांची व वनस्पतींची माहिती मिळते."
- डॉ. बी. कार्थिक, वैज्ञानिक- आघारकर संशोधन संस्था

- पर्यावरणातील 'कारबनडायऑक्साईड'ला कमी करण्यास सक्षम
- कार्बनला जिरवण्यासाठी उपयुक्त
- याचा वापर जैवइंधन निर्मितीसाठी केला जातो
- श्वास घेण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजन या घटकाची निर्मिती करण्यास सक्षम
- निर्माण करण्यामध्ये महत्वाचा वाटा आहे असे करा
- जागतिक पातळीवर पर्यावरणातील ऑक्सिजन निर्माण करण्यामध्ये महत्वाचा वाटा आहे 
- मस्यांमधून मिळणाऱ्या 'ओमेगा थ्री फॅटी ऍसिड'च्या निर्मितीसाठी महत्वपूर्ण


संशोधनाबाबत
- संशोधनाचा मूळ उद्देश मानवी प्रकऱ्यांमुळे शहरी तलावापासून दुर्मिळ डायटॉमचा (एकपेशीय शेवाळ अथवा वनस्पती) अभ्यास होता
- यासाठी पवई तलावातील जलपर्णीच्या पाण्यात असलेल्या भागांचे नमुने घेऊन त्यातील अभ्यास करण्यात आला
- अभ्यासादरम्यान हे दुर्मिळ शेवाळ आढळून आले
- 'सुडोस्टॉरॉसिरॉपसिस जीयोकोलॅग्रम' नावाचे हे शेवाळ आशिया मध्ये पहिल्यांदा सापडले असून यापूर्वी यांची नोंद उत्तर अमेरिका, मध्य जपान, पोलंड सारख्या देशात झाली असून भारतात सापडलेली ही प्रजाती वेगळी आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Oneplus Nord CE 5 : वनप्लस Nord CE 5 लवकरच होणार लॉन्च; 7100mAh दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत फक्त..

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

SCROLL FOR NEXT