पुणे

डोळ्यांसाठी नवी उपचार पद्धत

सकाळवृत्तसेवा

पुणे - डोळ्याला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी बंद पडल्याने रुग्णाला अंधत्व येण्याचा धोका असतो. यातून येणारे अंधत्व कमी करण्यासाठी ‘टीपीए’ हे इंजेक्‍शन विकसित करण्यात आले आहे. हे इंजेक्‍शन देऊन रक्तवाहिनीची गाठ विरघळवण्याची नवी शस्त्रक्रिया अस्तित्वात आली आहे, अशी माहिती जपान येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. शीन यामने यांनी येथे दिली.

‘राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्था’तर्फे (एनआयओ), तसेच पुणे नेत्ररोग संघटना आणि महाराष्ट्र नेत्ररोग संघटनेच्या सहकार्याने डोळ्यांच्या आजारांसंदर्भात परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या परिषदेदरम्यान डॉ. यामने यांचा डॉ. चिराग भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख आदी उपस्थित होते

 डोळ्याला इजा होऊन मोतीबिंदू झालेल्या रुग्णांवर कृत्रिम भिंगारोपण करता येत नाही. त्यामुळे डोळ्याच्या पांढऱ्या भागात एका विशिष्ट प्रकारे ती लेन्स बसविण्यात येते.  डोळ्याच्या कृत्रिम भिंगाला आधार नसताना डोळ्यांत लेन्स बसविता येते. त्या पद्धतीला ‘यामाने लेन्स इम्प्लांट’ असे म्हटले जाते, असेही त्यांनी सांगितले.

सिंगापूर येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. यान येऊ म्हणाले, ‘‘नेत्रपटलांच्या विकारांचा शोध घेण्यासाठी अँजिओग्राफी करण्यात येते. ही अँजिओग्राफी करताना पूर्वी हाताच्या शिरेतून इंजेक्‍शन दिले जात होते. त्यात ॲलर्जीची शक्‍यता होती. आता याबाबत नवी पद्धत विकसित झाली आहे. डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी ही पद्धत उपयुक्त आहे.’’

लहान मुलांसाठीचे नेत्रतज्ज्ञ डॉ. परीक्षित गोगटे यांना एम. जी. भिडे पुरस्कार, तर दिल्लीच्या ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’च्या (एम्स) नेत्रतज्ज्ञ डॉ. नम्रता शर्मा यांना ‘डॉ. ए. एम. गोखले पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. दरम्यान, ऑस्ट्रोलियातील डॉ. डॅनिअल ब्लॅक यांनी मल्टीफोकल इंट्राऑक्‍युलर लेन्सचे फायदे-तोटे यावर, तर फिलिपिन्सचे डॉ. यान हार्वे यांनी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी असलेल्या अद्ययावत फेम्टोलेसर कॅटरॅक्‍ट सर्जरी, मायक्रो इन्सिजन फेको इमल्सीफिकेशन, कंप्युटर गायडेड कॅटरॅक्‍ट सर्जरी या संदर्भात माहिती दिली. तसेच, डॉ. श्रीकांत केळकर, डॉ. आदित्य केळकर यांनी मार्गदर्शन केले. डॉ. जाई केळकर यांनी प्रास्तविक केले. अरुणा केळकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयूष चावलाच्या फिरकीची जादू चालली, हेडपाठोपाठ क्लासेनलाही केलं क्लिन-बोल्ड; हैदराबादचा निम्मा संघ गारद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT