New Year welcome with fireworks at twelve beats in Pune 
पुणे

Happy New Year 2020 : पुण्यात बाराच्या ठोक्‍यावर फटाक्‍यांची आतषबाजी करत नववर्षाचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी मंगळवारी रात्री तरुणाई मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली होती. शहरातील एफसी रस्ता, एमजी रस्ता, एमजी रस्ता यासह उपनगरांतील महत्वाच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन करण्यात आले. अनेकांनी फुगे आकाशात सोडत सरत्या वर्षाच्या निरोप घेत नवीन वर्षांचे स्वागत केले.

Global Family Day 2020 : मुलगी भारतीय, मुलगा जपानी अन् खुललाय सुखी संसार...
बाराच्या ठोक्‍यावर एकमेकांना शुभेच्छा देण्यात आला. फटाक्‍यांची आतषबाजी करीत शहरातील काही भागांत तरुणाई गाण्यांवर थिरकताना दिसली. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावर असलेल्या हॉटेल्समध्ये पार्टीसाठी पुणेकरांनी गर्दी केली होती. तर क्‍लब अणि पबमध्ये तरुणाई थिरकताना दिसली. काही ठिकाणी आकर्षक सजावट करण्यात त आली होती. अशा ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी तरुणाईची गर्दी झाली होती. दुचाकीवरून शहरात फेरफटका मारत तरुणाईने एकच जल्लोष केला. पहाटेपर्यंत जागे राहून नागरिकांनी नूतन वर्षाचे स्वागत केले. सोसायटीमधील रहिवाशांनी देखील नवीन वर्षांचे नियोजन केले होते.
गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढल्याने नागरिक गरम कपडे परिधान करून रस्त्यावर फेरफटका मारत होते.

पुणे विद्यापीठात बाटली नव्हे, ग्लासानेच प्यायचे पाणी

मद्यपी तरुणांना रोखण्यासाठी शहरातील प्रमुख चौकात आणि मोक्‍माच्या नाकाबंदी करण्यात आली होती. यामध्ये अल्कोमीटर आणि ब्रेथऍनलायझरद्वारे ठिकठिकाणी तपासणी करून डंक अँड ड्राईव्ह करणा-यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. बुधवारी पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT