Traffic 
पुणे

Pune Traffic Updates: शिवण्यात वाहतूक कोंडी; दुचाकींच्या लागल्या रांगा

सकाळ वृत्तसेवा

वारजे माळवाडी (पुणे) : शिवणे येथील नवभारत हायस्कूलजवळ गुरुवारी (ता.३१) संध्याकाळी साडे सहा ते आठ वाजेपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी वाहतूक कोंडी सुरू झाली आहे. 

बहुली रस्त्याला शिवणे गावातून नांदेडकडे जाण्याचा रस्ता सुरू होतो. या तिकोण्यावर किरकोळ वाहतूक कोंडी होते. गुरुवारी अचानक एक चारचाकीमध्येच आली. दुचाकी चालकांनी अतिघाईने पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याने ही वाहतूक कोंडी वाढली.  

रस्ता अरुंद असताना याठिकाणी सतत वाहतूक कोंडी होत होती. रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर पुन्हा एकदा येथे वाहतूक कोंडी सुरू झाल्याचे वाहन चालकांना अनुभव आला आहे. तसेच येथील सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिस कर्मचारी यांनी मिळून वाहतूक सुरळीत केली. 

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक तरुण-तरुणी ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी बाहेर पडले. फार्म हाऊस, रिसॉर्ट अशा ठिकाणी मोठ्या पार्ट्यांचे आयोजन या भागात केले जाते. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने काही नियम ठरवून दिले आहेत. त्यामुळे मोठ्या पार्ट्यांच्या आयोजनावर मर्यादा आल्या आहेत.

काही उपद्रवी पर्यटक, मद्यप्राशन करुन वाहन चालविणारे तरुण-तरुणी यांच्याकडून अपघात किंवा इतर काही गैरप्रकार होऊ नयेत म्हणून शहराच्या विविध भागात पोलिसांकडून वाहनचालकांची तपासणी केली जात आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT