Newly_marriag_ couple 
पुणे

Lockdown : हनिमूननंतर बायकोला सोडायला सासरी गेला अन् 'तो' तिकडेच अडकला!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : हनिमूनवरून परतल्यानंतर पत्नीच्या आग्रहाखातर तिला हैदराबाद येथे माहेरी घेऊन गेलेला पती लॉकडाऊनमुळे सासरवाडीलाच अडकला आहे. त्यामुळे त्यांचा संसार देखील आता सासरवाडीलाच सुरू झाला आहे. 

लॉकडाऊनमुळे अनेक जोडपे किंवा लहान मुलं आणि त्यांच्या आई-वडिलांची ताटातूट झाली आहे. या सर्वात रोहित आणि दिशा यांची जोडी मात्र काहीशी लकी ठरली, पण त्यांना नवीन संसाराची सुरुवात मात्र सासरवाडीला करावी लागली आहे.

लॉकडाऊन सुरू होण्याच्या काही दिवस आधीच त्यांचे लग्न झाले होते. त्यानंतर हे जोडपे हनिमूनसाठी गोव्याला गेले तिकडून परत येतानाच पत्नीने हैदराबाद येथे माहेरी जाण्याचा आग्रह केला. त्यामुळे दोघेही हैदराबादला गेले आणि दुसऱ्याच दिवशी लॉकडाऊन सुरू झाला.

याबाबत रोहित यांनी सांगितले की, आम्ही 25 मार्च रोजी पुण्याला येण्यासाठी बुकिंग केले होते. मात्र लॉकडाउनमुळे ते रद्द झाले. त्यानंतर पुन्हा 16 एप्रिल रोजी बुकींग केले. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने ते देखील रद्द झाले. त्यामुळे आमचा संसार आता सासरवाडीलाच सुरू झाला आहे. मात्र आम्ही कधी पुण्यात परतणार याची वाट माझे कुटुंबीय पाहत आहेत. तीन मेनंतरचे बुकिंग करा, असा त्यांचा आग्रह आहे. मात्र आता कोरोनाची परिस्थिती काय असेल, त्यानुसार आम्ही निर्णय घेणार आहोत.

लॉकडाऊनमुळे दिशा हिला माहेरी राहण्यास मिळत आहे, पण आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे. आम्ही हनिमूनसाठी परदेशात जाणार होतो. मात्र कोरोनामुळे नियोजन बदलले, असे दिशा हिने सांगितले. 

सासरच्यांकडून भरपूर प्रेम मिळतेय
जावई सासरवाडीला आला की, त्याचा पाहुणचार ठरलेला असतो. मात्र रोहित एक-दोन नव्हे तब्बल 40 दिवस सासरवाडीला मुक्कामी आहे. सासरच्यांकडून भरपूर प्रेम मिळत असून माझ्या आवडीचे पदार्थ येथे बनवले जात आहेत. त्यामुळे आम्ही सर्व भरपूर एन्जॉय करत असल्याचे रोहित यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT