pune sakal
पुणे

सावधान ! पुढील स्टेशन पोलिस स्टेशन

मेट्रो स्थानक व रेल्वेवरील कॅमेऱ्यांमुळे महिला सुरक्षित

सुवर्णा कुसाळे

कोरेगाव पार्क : मेट्रोचे पुढील स्टेशन... पोलिस स्टेशन, काय घाबरलात ना, हो हे खरे आहे. महिलांना बस असो कि लोकल मध्ये होणारा त्रास हा सर्वश्रृत आहे. टवाळखोर किंवा समाजकंटक सार्वजनिक वाहनांमध्ये महिलांशी गैरवर्तन करतात. त्यावेळी महिला असह्य असते. त्यांना तक्रारही करता येत नाही. मात्र आता मेट्रो प्रवासात असे होणार नाही. येथील शेकडो कॅमेऱ्यांमुळे असभ्य वर्तन करणाऱ्यांना पोलिस पुढील स्थानकात ताब्यात घेऊन त्यांची थेट रवानगी पोलिस ठाण्यात करणार आहेत. (Pune News)

महिलांना सार्वजनिक वाहनांमध्ये प्रवास करताना अनेक वाईट घटनांना सामोरे जावे लागते. बस असो कि लोकल ट्रेन यामध्ये प्रवास करताना महिलांची छेडछाड होते.गर्दीचा फायदा घेऊन अनेकजण महिलांना त्रास देतात. यावेळी महिला असह्य असतात. त्यांना लक्षात येऊन सुध्दा सार्वजनिक ठिकाण असल्यामुळे तक्रार करण्याची धाडस दाखवीत नाहीत. मात्र आता पुणे मेट्रोच्या स्थानकांसह रेल्वेतील असंख्य कॅमेऱ्यांमुळे युवती, महिला असो कि विद्यार्थीनी सुरक्षित असणार आहेत. मेट्रोच्या परिसरात गैरवर्तन करणारे मध्यवर्ती नियंत्रण कक्षामध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येणार आहे. त्यामुळे ते तत्काळ पोलिसांना माहिती देतील. पोलिस संबंधित व्यक्तीचे छायाचित्र घेऊन त्याला ताब्यात घेऊन त्याची थेट रवानगी पोलिस ठाण्यात करतील. त्यामुळे असभ्य वर्तन करणाऱ्यांचे निश्‍चत स्थानक हे पोलिस ठाणे असणार आहे.

मेट्रोचा पहिला व शेवटचा डबा नारीशक्तीचा :

मेट्रोचा प्रवास विशेषत: महिला व मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करून केला गेला आहे. त्यामुळे महिलांसाठी मेट्रोच्या पहिल्या व शेवटचा डबा हा नारीशक्ती असे नामकरण केले गेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT