NIA Director General Sadanand Date addressing a police gathering in Pune with a strong statement on law and order.

 

esakal

पुणे

Sadanand Date on Police : 'NIA' महासंचालक सदानंद दातेंनी पोलिस दलाबाबत पुण्यात केलं मोठं विधान, म्हणाले...

NIA Chief Sadanand Date News : ‘’यंत्रणेतील भ्रष्टाचार दूर करणं, ती पारदर्शक बनवणं, लोकभिमूख बनवणं हा अग्रमक हवा’’ असंही म्हणाले आहेत.

Mayur Ratnaparkhe

NIA Sadanand Date Statement : नानासाहेब परुळेकरांच्या 128व्या जयंती निमित्त पुण्यात सकाळ तर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना NIAचे महासंचालक सदानंद दाते यांनी भविष्यातील आव्हानं यावर आपले विचार मांडले. यावेळी त्यांनी आजच्या पोलिस दलाच्या परिस्थितीवरही भाष्य केलं.

सदानंद दाते म्हणाले, ‘’भविष्यातील आव्हानांना सामोरं जायचं असेल आणि आपण जर आपलं कठोर परीक्षण केलं, तर आपल्याला काही सुधारणांचे काही नवीन उपाय दिसू शकतात. त्यावर मी एक दिशा दर्शन करणार आहे. सगळेच विचार सांगता येणार नाही.’’

तसंच ‘’आपण आज जर पोलिसांच्या मूळ कामाकडे बघिलं तर हे जे मूळ काम आहे, अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेचं तर आपल्याला तर आपल्याला असं लक्षात येईल की पोलिस आणि जनता यांचा जितका चांगला संबंध असायला पाहीजे, तितका चांगला संबंध नाही. जनतेचा पाठिंबा पूर्णपणे नाही हे आजच्या पोलिस व्यवस्थेच्या अपूरेपणाचं एक महत्त्वाचं कारण आहे, असं मी मानतो. हे कारण, का आहे? याच्या मूळाशी जर आपण गेलो. तर इंग्रजांनी इथे तयार केलेल्या पोलिस दलाचा उद्देश होता की, साम्राज्य टिकावायचं. पुढे पोलिस आणि स्वातंत्र्य चळवळ करणाऱ्या नागरिकांमध्ये संघर्ष निर्माण झाला, यामुळे पोलिसांबाबत लोकांचं मत वाईट होत गेलं.’’ असंही दाते यांनी सांगितलं.

याशिवाय, ‘’स्वातंत्र्यपूर्व काळात जे पोलिस भरती होतं, त्यांचं शिक्षण कमी होतं आणि त्यांना कमी पगार दिला जायचा. आता स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचं प्रमाण वाढलय आणि निश्चितपणे पोलिसा विभागातील शिपाई देखील आता उच्चशिक्षित आहेत. आता सहाव्या वेतन आयोगानंतर आता वेतनही अपुरं नाही. पण भ्रष्टाचार आहे.’’ असंही ते म्हणाले.

याचबरोबर  ‘’मला असं वाटतं की आपल्याला येणारी आव्हानं जर पेलायची असतील तर ज्या यंत्रणेवर समाजाच्या आणि देशाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, त्या यंत्रणेतील भ्रष्टाचार दूर करणं ही पारदर्शक बनवणं, लोकभिमूख बनवणं हा सुधारणेचा अग्रमक असायला पाहीजे आणि ते फक्त पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी करू शकत नाही, तर त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी एक भूमिका घ्यावी लागेल, की मी लाच देणार नाही आणि लाच घेऊ देणार नाही.’’ असे प्रतिपादन सदानंत दाते यांनी केले.

तर, ‘’देशातील अंतर्गत आव्हानं बघताना काश्मीर मधील फुटीरता, पंजाब मध्ये खलिस्तानी यांचे आव्हान, ईशान्य भारतात बांगलादेश आणि म्यानमार मधून होणारी घुसखोरी, मध्य भागातील दहशतवाद, इस्लामिक radical terrorism असे मोठे प्रश्न आहेत पण यावर आपण मात केली आहे.’’, असंही दाते यांनी यावेळी आधी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : ‘बळकट लोकशाही हाच अंतर्गत सुरक्षेचा पाया’; सदानंद दाते

MHADA: 'म्हाडा'ची घरं स्वस्त होणार; किंमतींमध्ये होईल ८ ते १० टक्क्यांची घट

Thane News: ठाण्याच्या नो एंट्रीमुळे पनवेल कोंडीत! १८ तासांच्या बंदीने घुसमट, वाहतूकदारांना फटका

INDW vs AUSW : ७८१ धावांचा पाऊस! पण, स्मृती मानधनाचे विक्रमी शतक वाया; ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वन डेसह जिंकली मालिका

Yermala News : पोलिसांची मोठी कारवाई! धाराशिव जिल्ह्यातील पाच कला केंद्रावर पोलिसांचे छापे

SCROLL FOR NEXT