Nigdi-to-Dapodi-BRT
Nigdi-to-Dapodi-BRT 
पुणे

निगडी-दापोडी बीआरटी मार्गाची पुन्हा चाचणी

ज्ञानेश्वर बिजले

पिंपरी - निगडी-दापोडी रस्त्यावरील बीआरटी बसमार्ग सुरू करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर येत्या गुरुवारी (ता. २) अंतिम सुनावणी होणार आहे. बीआरटी बससेवा सुरू झाल्यास, सुमारे सव्वा लाख प्रवाशांना शहरातून या मार्गावरून वेगाने ये-जा करता येईल. सेवा रस्त्यावरील बसगाड्यांच्या फेऱ्या कमी झाल्यामुळे तेथील वाहतूक कोंडीही काही प्रमाणात कमी होण्याची शक्‍यता आहे.

मार्गावरील सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून ॲड. हिंमतराव जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यानंतर महापालिकेने आयआयटी पवई यांची नियुक्ती करून सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजना मागविल्या. त्याची अंमलबजावणी केली. न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने याचिकाकर्त्यासोबत या मार्गाची पाहणी २४ व २५ एप्रिल रोजी केली. त्यानंतरचा अहवाल महापालिकेने उच्च न्यायालयात सादर केला होता. त्या संदर्भात १२ जुलैला सुनावणी झाली. त्या वेळी पुन्हा पाहणी करण्याची सूचना न्यायालयाने केली. त्यानुसार, महापालिका, पीएमपीएमएल, वाहतूक पोलिस यांचे अधिकारी आणि याचिकाकर्ते ॲड. जाधव यांनी या मार्गावर बसगाडी चालवून सुरक्षिततेच्या दृष्टीने बुधवारी (ता. २५) पुन्हा चाचणी घेतली. महापालिकेने त्याचा अहवाल न्यायालयात गुरुवारी (ता. २६) सादर केला.

न्यायालयाने बीआरटी सुरू करण्याचा आदेश दिल्यास, ऑगस्टमध्ये निगडी-दापोडी मार्गावरील बीआरटी बससेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू होतील. त्याच वेळी पुणे महापालिकेनेही पुणे-मुंबई रस्त्यावर खडकी ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चौकादरम्यान बीआरटीचे बसथांबे बांधण्यास सुरवात केली आहे. येत्या वर्षभरात ते काम झाल्यास, सुमारे वीस किलोमीटर अंतरातून बीआरटी बससेवा सुरू होईल.

बीआरटीचा प्रवास
२००६    केंद्र सरकारची बीआरटी संकल्पना
२००८    पिंपरी-चिंचवड महापालिकेचा बीआरटीचा डीपीआर (सर्वंकष प्रकल्प आराखडा) सादर.
२०१०    चार रस्त्यावरील ४५ किलोमीटर मार्गावर बीआरटीला केंद्राची मंजुरी
२०११    तीन रस्त्यांवरील बीआरटी बसथांबे व लेनच्या कामाला मंजुरी
२०१३    निगडी-दापोडी मार्गावरील बससेवेबाबत जनहित याचिका न्यायालयात दाखल
२०१५    सांगवी - किवळे, नाशिक फाटा - वाकड बीआरटी मार्ग सुरू
२०१८    निगडी-दापोडी मार्गावरील सुरक्षिततेचे उपाय केल्याचा महापालिकेचा न्यायालयात अहवाल
२०१८    काळेवाडी फाटा - देहू आळंदी रस्ता या बीआरटी मार्गाचे काम सुरू

निगडी-दापोडी मार्ग 
लांबी    १२.५ किलोमीटर
रुंदी     ६१ मीटर
द्रुतगती मार्ग रुंदी    २१ मीटर
बीआरटी मार्ग रुंदी    ३.५ मीटर (दोन्ही बाजूला)
सेवा रस्ता रुंदी    १०.५ मीटर (दोन्ही बाजूला)
सायकल ट्रॅक    २.५ मीटर (दोन्ही बाजूला)
पदपथ    २.५ मीटर (दोन्ही बाजूला)
हिरवा पट्टा    १ मीटर

बीआरटी बसथांबे    ३६
थांब्यातील अंतर    ४००ते ५०० मीटर
रस्त्यावरील सब वे    ५ ठिकाणी
सेवा रस्त्यावरून जाण्यासाठी    २६ ठिकाणे
चौक    ८
तीन मार्गांची ठिकाणे    ४
ग्रेडसेपरेटर    ४

बीआरटीची नियोजित बससेवा
निगडी-दापोडी मार्गावर सुमारे तीनशे गाड्यांच्या दररोज २२०० ते २३०० फेऱ्या होतील. हडपसर, पुणे महापालिका, पुणे रेल्वेस्थानक, कात्रज, बिबवेवाडी, वाघोली, खडकी, कोथरूड, वारजे माळवाडी, कोथरूड डेपो, तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, तळवडे, रावेत, पिंपरी, आकुर्डी रेल्वेस्थानक, हिंजवडी या ठिकाणी बीआरटी मार्गातून बससेवा सुरू राहील. बसथांबे, स्वतंत्र लेन व सुरक्षिततेचे उपाय यासाठी २५ कोटी खर्च झाले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT