Nigerian youth arrested for selling cocaine
Nigerian youth arrested for selling cocaine 
पुणे

पुणे : पावणे तीन लाखाच्या कोकेनसह तरुणास अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये कोकेन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणणाऱ्या एका नायजेरीयन नागरिकास सीमाशुल्क विभागाच्या पथकाने रविवारी (ता.22) ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन लाख 81 हजार रुपये किंमतीचे कोकेन जप्त करण्यात आले. 

सॅमसन विन्सेंट मॅक्‍सवेल (रा. साई गुरू प्रसाद, उंड्री, मूळ रा. नायजेरिया) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सीमाशुल्क विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकास एक नायजेरीयन तरुण शहरातील काही भागामध्ये कोकेन हे अंमली पदार्थ विक्री करीत असून सध्या तो उंड्री येथील त्याच्या घरी असल्याची खबर मिळाली होती.

त्यानुसार, सीमाशुल्क विभागाच्या सहआयुक्त वैशाली पतंगे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने उंड्री येथीलसाई गुरू प्रसाद या सोसायटीच्या 'ए' बिल्डींगमधील 504 क्रमांकाच्या सदनिकेमध्ये छापा घातला. त्यावेळी मॅक्‍सवेल तेथे आढळून आला. त्याच्याकडून 35.20 ग्रॅम इतके वजनाचे व दोन लाख 81 हजार रुपये किंमतीचे कोकेन, पासपोर्ट व अन्य पुरावे जप्त करण्यात आले. त्यास अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्यात आले, त्यानुसार त्यास न्यायालयीन कोठडी प्राप्त झाली आहे. 

सीमाशुल्क विभागाने मागील नऊ महिन्यात जप्त केलेले एक कोटी सात लाख रुपये किंमतीचे अंमली पदार्थ रांजणगाव औद्योगिक विकास महामंडळातील (एमआयडीसी) महाराष्ट्र इन्विरो पॉवर या कंपनीच्या आवारामध्ये नष्ट करण्यात आले. सीमाशुल्क विभागाकडून यापूर्वी 30 मार्च 2019 या दिवशी एक कोटी दोन लाख रुपये किंमतीचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले होते. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT