Crime_Murder 
पुणे

पुणे : गँग वॉरमध्ये एकाचा खून करणाऱ्या ९ जणांना जन्मठेपेची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कुख्यात गुंड संजय ऊर्फ पिंट्या सदाशिव मारणे यांच्या खूनाचा बदला घेण्यासाठी तसेच जमीन खरेदी विक्रीच्या आर्थिक फायद्यावरून एकाचा खून करणाऱ्या नऊ जणांना न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी हा निकाल दिला.

स्वप्नील विजय भिलारे (वय २५), अनिल छबन खाटपे (वय २८), महेश दत्तात्रेय वाघ (वय २८), स्वप्नील संभाजी खाटपे (वय २१, सर्व रा. भुकूम), वैभव प्रभाकर शेलार (वय २३, रा. कर्वेनगर), पप्पू गणपत उत्तेकर (वय ३२, रा. मुठा, मुळशी), राम बाळू केदारी (वय २४, रा. कोथरूड), हेमंत रमाकांत गोडांबे (वय २५) आणि सागर संभाजी गोळे (दोघेही रा. पिरंगुट) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. पिंट्या याच्या खुनातील आरोपी एकनाथ बबन कुढले (वय ३२, रा. खापटेवाडी, भुकूम) याचा एक डिसेंबर २०१४ रोजी सकाळी नऊच्या सुमारास भुकूममधील रामेश्‍वर मंदिराजवळ तलवार, कोयता, चॉपर अशा हत्यारांनी वार करून खून करण्यात आला होता.

या प्रकरणी त्याचा भाऊ काशिनाथ बबन कुढले (वय ३०, रा. भुकूम) यांनी पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. टोळीचे वर्चस्व वाढविण्यावरून एकनाथ आणि स्वप्नील भिलारे यांच्या वाद झाला होता. तसेच पिंट्या याच्या खुनात एकनाथ आरोपी असल्याने भिलारे हे त्यावर चिडून होता. त्यामुळे पिंट्याच्या खूनाचा बदला घेण्यासाठी शिक्षा झालेल्या गुन्हेगारांनी एकनाथ यांचा खून केला, अशी फिर्याद देण्यात आली होती.

या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील विकास शहा यांनी पाहिले. त्यांनी एकूण १६ साक्षीदार तपासले. न्यायालयीन कामकाजात पोलिस हवालदार विजय चौधरी यांनी मदत केली.

भावासमोर झाला खून :
घटनेच्या दिवशी एकनाथ याने आणून दिलेले पेपर वाटण्यासाठी फिर्यादी काशिनाथ हे त्यांच्या दुचाकीवरून भुकूमकडे जात होते. तेव्हा आरोपी घटनास्थळी त्यांच्या भावाशी वाद घालत होते. त्यानंतर आरोपींनी एकनाथच्या डोळ्यात मिरचीपूड टाकल्याने तो पळू लागला. आरोपींनी त्याचा पाठलाग करीत कोयत्याने वार करून खून केला. एकनाथ खाली पडल्यानंतर आरोपी पसार झाले होते. त्यानंतर फिर्यादी यांनी एकनाथ याला रुग्णालयात नेले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली! कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकल ठप्प, ४५ मिनिटं प्रवाशांचा खोळंबा

Balochistan Blast : बलुचिस्तानात पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर मोठा हल्ला; २३ जवानांचा मृत्यू , BLAचा हात असल्याचा संशय

Baramati Crime News: बारामतीतील पणदरे गावात विवाहित महिलेचा गळा आवळून खून; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : अरविंद केजरीवाल यांची 'गोवा फॉरवर्ड पार्टी' आणि 'आम आदमी पार्टी' च्या युतीची घोषणा

Junnar Lok Adalat : जुन्नर राष्ट्रीय लोकन्यायालयात ६८२३ प्रकरणे निकाली; ४.३९ कोटींची वसुली, २३ वर्षे प्रलंबित भूसंपादन प्रकरणाचा निकाल

SCROLL FOR NEXT