khadakwasla1.jpg 
पुणे

कोरोना विरूध्दची लढाई आरोग्य कर्मचाऱ्यासह `ते` आठजण जिंकले

सकाळवृत्तसेवा

खडकवासला (पुणे) : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात चालक म्हणून कार्यरत असलेल्या 52 वर्षाच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. ती लढाई जिंकून ते घरी परतले. त्यांच्यासह आठ नातेवाईक घरी आले. खानापूर परिसरातील ग्रामस्थांनी त्यांचे टाळ्या वाजून फुलांची उधळण करत स्वागत केले. 

सदर व्यक्ती पालिकेच्या टिळक रस्त्यावरील कार्यालयात आरोग्य विभागात चालक म्हणून कार्यरत होते. कोरोनाच्या संदर्भात अत्यावश्यक सेवेत ते काम करत होते. आजारी असल्याने ते खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. तेथे त्यांची चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्यांना कोरोनाची लागण  झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्या घरातील त्याच्या जास्त संपर्कात आलेल्या नातेवाईक व ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली.

त्यांच्यासह एकूण दहा जणांना दहा जणांना लागण झाली होती. त्यातील आठ जण आज घरी परतले आहेत. अन्य दोघांच्या वर उपचार सुरू आहेत. त्यांचे स्वागत करण्यासाठी खानापूरचे उपसरपंच अमित पवार, ग्रामसेवक सुनील खैरनार, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. तांबोळी, फौजदार ऋतुजा मोहिते, पोलीस पाटील गणेश सपकाळ, शिवसेनेचे मतदार संघाचे प्रमुख नितीन वाघ, मणेरवाडीचे माजी उपसरपंच तानाजी थोपटे, लाला जावळकर नंदू जावळकर,  नारायण जवळकर,  श्रीनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनिल जवळकर उपस्थित होते. आरोग्य विभागाने दिलेल्या नियमांचे पालन करुन स्वागत करण्यात आले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : “एकनाथ शिंदे यांना मराठ्यांमध्येच मारामाऱ्या लावून दंगल घडवायची आहे", जरांगे यांचा गंभीर आरोप

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT