koth.jpg
koth.jpg 
पुणे

कोथरूडकर काळजी घ्या...! कारण आता कोविड योध्दे...

सकाळवृत्तसेवा

कोथरूड : कोरोना योध्दा म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावलेल्या कोथरूड पोलिसांत छुप्या पद्धतीने कोरोनाने शिरकाव केल्याने कोथरूड करांची चिंता वाढली आहे. एका महिला पोलिस कर्मचार्याचा आहवाल पाॅझिटीव्ह आला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 कोथरूड पोलिस ठाण्याच्या वरीष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी सांगितले की, नऊ पोलिसांना क्वारंटाईन केले आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सचा वापर करावा.  

सोमवार पेठ भागातून कोथरूडमध्ये येणा-या महिला कर्मचा-याची मैत्रिण पाॅझिटीव्ह आढळल्याने तीने स्वतःचीही तपासणी करून घेतली. आज आपला तपासणी अहवाल पाॅझिटीव्ह आल्याचे तिला समजले. दरम्यान् सहकारी कर्मचारयांचा अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने धक्का बसला असला तरी आम्ही लढवय्ये आहोत. अशा घटनेमुळे आमच्या मनोधैर्यावर काहीही परिणाम होणार नाही. अशी भावना पोलिसांनी व्यक्त केली. या कर्मचारी महिलेत कोणतीही लक्षणे जाणवत नसल्याने एकत्र  काम करणे, जेवण व्हायचे. पण आपल्या सहक-याचा तपासणी अहवाल पाॅझिटीव्ह आल्याचे समजताच आपल्या नशिबात काय लिहून ठेवले आहे, ही चिंता कितीही नाही म्हटले तरी पोलिसांना पडली आहे.

कोथरूडची लोकसंख्या जास्त असली तरी पोलिस संख्या कमी आहे. एक शिफ्टला चाळीस पोलिस येथे उपलब्ध असतात. आता कोरोनामुळे क्वारंटाईन झालेल्या पोलिसांच्या बदल्यात नविन कर्मचारी उपलब्ध होतील का? न झाल्यास कामाचा ताण कसा कमी करायचा हे आव्हान कोथरूड पोलिसांसमोर आहे. दरम्यान, आज तीन नवे रूग्ण आढळल्याने कोथरूडमधील एकूण कोरोना रूग्ण 26 असून, 17 पाॅझिटीव्ह आहेत. एकाचा मृत्यू झाला असून, 8 जण कोरोनामुक झाले असल्याचे कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त संदीप कदम यांनी सांगितले. 

कोथरूडच्या वस्ती भागात कोरोनाने शिरकाव करू नये म्हणून पोलिस, महानगरपालिका व आरोग्य विभागाने कठोर मेहनत घेतली. त्याला लोकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला होता.  लाॅकडाउन शिथील झाले. दारूची दुकाने सुरू झाली आणि लोकांचे वेगवेगळ्या भागातून येणे जाणे सुरू झाले. त्याचा परिणाम म्हणून कोरोनाचा वस्ती भागात शिरकाव झाला. 

तसेच सोसायटीबरोबरच आता दाट लोकवस्ती असलेल्या भागात कोरोना रूग्ण आढळू लागले आहेत. आता पोलिसच पाॅझिटीव्ह आढळल्याने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. पोलिस, सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी यांची नियमित तपासणी करावी, तसेच तपासणी अहवाल त्याच दिवशी मिळाले तर अनेक अनर्थ टळतील असे मत स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT