Nitin Gadkari one-day visit to Baramati on Saturday pune politics sharad pawar  esakal
पुणे

Nitin Gadkari : नितीन गडकरी शनिवारी एक दिवसाच्या बारामती दौ-यावर

ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आदी मान्यवर नितीन गडकरी यांच्यासमवेत असतील

मिलिंद संगई, बारामती

बारामती - अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सेंटर ऑफ एक्सलन्स डेअरी प्रकल्पाच्या उदघाटनासह विद्या प्रतिष्ठानच्या सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर युथ डेव्हलपमेंट प्रयोगशाळेच्या उदघाटनासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी शनिवारी (ता. 11) बारामतीत येत आहेत.

ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आदी मान्यवर नितीन गडकरी यांच्यासमवेत असतील. दुपारी साडेबारा वाजता सेंटर ऑफ एक्सलेन्सचे उदघाटन करुन डेअरी प्रकल्पास ते भेट देतील. दुपारी सव्वा दोन वाजता इनक्युबेशन सेंटर येथे नवउद्योजकांशी ते चर्चा करणार आहेत, त्या नंतर कृषी विज्ञान केंद्र व राजीव गांधी सायन्स सेंटरला ते भेट देणार आहेत.

दुपारी सव्वातीन वाजता अप्पासाहेब पवार सभागृहात होणा-या कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. या वेळी फेलोशिप पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. दुपारी सव्वा चार वाजता विद्या प्रतिष्ठान संकुलास गडकरी भेट देणार असून सेंटर ऑफ एक्सलेन्स फॉर युथ डेव्हलपमेंटच्या प्रयोगशाळेचे उदघाटन त्यांच्या हस्ते होईल. सव्वा पाच वाजता बारामती विमानतळावरुन ते प्रयाण करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Businessman Cheating Wife : गर्लफ्रेंडसोबत मलेशियाला जाण्याचा प्लॅन; पत्नीला सांगितले बिझनेस ट्रिप, विमानतळावरच बिंग फुटले, पुण्यातील उद्योगपतीचा कारनामा

Asian Games: भारताच्या लेकींचा धुमाकूळ! एलावेनिलचे दुहेरी यश, तर सचिकाचे MMA मध्ये पदक पक्के अन् क्रिकेटमध्येही वाजवला डंका

सोन्याच्या हव्यासापोटी सात मित्र पोहोचले शापित हवेलीत; ‘भूतम् भयम्’चा थरार कुठे आणि कधी पहायला मिळणार?

गणरायाला निरोप देताना आक्रित घडलं! कृत्रिम तलावात शॉक लागून १९ वर्षीय तरूणाचा मृत्यू; लेकाचा मृतदेह पाहून वृद्ध वडिलांचा आक्रोश

ASTROLOGY: या ३ तारखांना जन्मलेले लोक असतात कुबेराचे लाडके? धन-दौलत, प्रॉपर्टीच्या बाबतीत मिळतो भाग्याचा साथ; तुमची जन्मतारीख कोणती?

SCROLL FOR NEXT