CNG
CNG Sakal
पुणे

थकबाकी न मिळाल्यास शुक्रवारपासून सीएनजीचा पुरवठा बंद

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सीएनजी पुरवठ्याचे (CNG Supply) पैसे (Money) वेळेत दिले नाहीत म्हणून पुन्हा एकदा पुरवठा बंद (Supply Close) करण्याचा इशारा महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) (MNGL) पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) (PMP) दिला आहे. गुरुवारपर्यंत (ता.१७) पैसे न भरल्यास शुक्रवारपासून (ता. १८) पुरवठा बंद करण्यात येर्इल, असे एमएनजीएलने स्पष्ट केले आहे. (No Arrears Received CNG Supply Cut Off from Friday MNGL PMP)

पीएमपीला एमएनजीएलचे ४९ कोटी २६ लाख रुपये देणे आहे. याबाबत एमएनजीएलकडून मार्चपासून पाठपुरावा सुरू आहे. पीएमपी ताफ्यात दोन हजारपेक्षा अधिक बसेस आहेत. त्यातील बाराशे बसेस या सीएनजीवर धावणा-या आहेत. या बसेससाठी एमएनजीएलकडून गॅस पुरवठा केला जातो. थकबाकी भरण्यासाठी एमएनजीएलने प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, तरीदेखील थकबाकी न भरल्याने एमएनजीएलने कठोर निर्णय घेत १८ तारखेपासून पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने १० जून रोजी एमएनजीएलला ५ कोटी रुपये दिले. मात्र, तरीदेखील थकीत रक्कम मोठ्या प्रमाणात आहे.

दरम्यान, संचारबंदीमुळे ३ एप्रिलपासून प्रवासी वाहतूक बंद असल्याने उत्पन्न मिळू शकले नाही. या पार्श्‍वभूमीवर एमएनजीएलची थकबाकी देण्यासाठी पीएमपीएल प्रशासनाने दोन्ही महापालिका आयुक्तांना अतिरिक्त निधीची मागणी केली आहे. हा निधी मिळाल्यास थकबाकी देता येणे शक्य असल्याची माहिती पीएमपीएल प्रशासनाकडून देण्यात आली.

एमएनजीएलला गेल्या दोन महिन्यात पाच कोटी रुपयांची थकबाकी देण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे पीएमपीच्या उत्पन्नावर देखील परिमाण झाला आहे. एमएनजीएल देण्यासाठी संचलन तुटीच्या व्यतिरिक्त दरमहा १० कोटी पुरविण्यात यावी, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

- डॉ. राजेंद्र जगताप, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश मस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील शाळांमधून विद्यार्थ्यांना काढलं बाहेर; बॉम्बची धमकी आल्यामुळे प्रशासन अलर्ट

Abhijeet bhattacharya: "लग्नात गाणं गायल्यानं औकात कमी होते", म्हणणाऱ्या अभिजीत भट्टाचार्यांना गायकानं व्हिडीओ शेअर करत दिलं सडेतोड उत्तर

T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन; 'या' खेळाडूंना मिळणार अंतिम-11 मध्ये स्थान

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

SCROLL FOR NEXT