politics sakal media
पुणे

Breking News : खेडचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर

राजेंद्र सांडभोर

राजगुरूनगर : स्वपक्षातील सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने दाखल केलेला अविश्वास ठराव, त्यानंतर सदस्यांचा डोणजे येथील रिसॉर्टवर मुक्काम, तिथे जाऊन सभापती व शिवसेना समर्थकांकडून राडा, त्यानंतर पोखरकरांना झालेली अटक; या नाट्यमय घडामोडीनंतर, अखेर आज खेड पंचायत समितीचे सभापती, शिवसेनेचे भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठराव ११ विरूद्ध ३ मतांनी मंजूर झाला. खेड तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सभापतींवर अविश्वास ठराव मंजूर झालेला आहे.

सभापती पोखरकर यांच्या विरोधात २४ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. त्या ठरावावर मतदान घेण्यासाठी, आज सकाळी ११ वाजता पंचायत समिती सदस्यांची सभा, बोलाविली होती. सभेस सर्व १४ पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. अटक असतानादेखील सभापती पोखरकरांना, न्यायालयाच्या आदेशानुसार मतदानासाठी आणण्यात आले होते.

सभा सुरू झाल्यानंतर सभापती पोखरकर, कॉंग्रेसचे सदस्य अमोल पवार, शिवसेनेचे बंडखोर सदस्य अंकुश राक्षे यांची भाषणे झाली. अविश्वास ठराव मंजूर करणे तालुक्याच्या इभ्रतीच्या दृष्टीने योग्य नाही. सभापती येथेच राजीनामा देतील, ठराव मागे घ्या, असा प्रस्ताव अमोल पवार यांनी मांडला. पोखरकरांनीही तशी विनंती केली, पण त्यांना अविश्वास ठरावावर सह्या केलेल्या ११ सदस्यांनी प्रतिसाद दिला नाही. पीठासीनअधिकाऱ्यांनी ठराव मंजुरीसाठी मांडल्यानंतर ११ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने हात वर करून पाठिंबा दिला. शिवसेनेचे सुभद्रा शिंदे, अमर कांबळे, वैशाली जाधव, सुनिता सांडभोर, अंकुश राक्षे, मच्छिंद्र गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण चौधरी, मंदाबाई शिंदे, नंदा सुकाळे व वैशाली गव्हाणे आणि भाजपचे सदस्य उपसभापती चांगदेव शिवेकर यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. तर शिवसेनेचे सभापती पोखरकर, ज्योती अरगडे आणि काँग्रेसचे अमोल पवार यांनी ठरावाच्या विरुद्ध मतदान केले.

खेड तालुक्याच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे. शिवसेनेच्या सुभद्रा शिंदे व मच्छिंद्र गावडे या दोन सदस्यांचे हात खाली होते. पण नंतर त्यांना बळजबरीने हात वर करण्यास सांगण्यात आले. अतिशय गलिच्छ आणि घाणेरडे राजकारण याठिकाणी केले जात आहे. त्यामुळे या प्रक्रियेविरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत. खरेतर आपसात ठरल्याप्रमाणे पोखरकरांनंतर मला सभापती करण्याचे ठरलेले होते. पण पंचायत समितीच्या इमारतीचे काम थांबविण्यासाठी हे खालच्या स्तरावरचे राजकारण केले गेले.

-अमोल पवार, पंचायत समिती सदस्य, (काँग्रेस)

अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर सभागृहाबाहेर आल्यावर शिवसेनेच्या सदस्या ज्योती अरगडे यांना रडू कोसळले. स्वर्गीय माजी आमदार सुरेश गोरे यांच्याशी, त्यांनी निवडून आणलेल्या सदस्यांनीच इमान ठेवले नाही, असे त्या म्हणाल्या. आपले पती केशव अरगडे यांना विनाकारण या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

या अविश्वास ठरावाच्या निमित्ताने महसूल व पोलीस अधिकाऱ्यांनी अतिशय आततायीपणा केला. गरजेपेक्षा खूपच मोठा फौजफाटा याठिकाणी आणून, पंचायत समितीच्या परिसराला छावणीचे स्वरूप दिले होते. राज्य राखीव दल, शीघ्र कृती दल आणि दंगल नियंत्रण पथकाच्या तुकड्या याठिकाणी बंदोबस्तासाठी आणल्या गेल्या होत्या. पत्रकारांनाही वार्तांकनासाठी पंचायत समिती आवारात जाऊ दिले नाही.

पंचायत समितीच्या इमारतीचे काम थांबविण्यास मी आमदार दिलीप मोहिते यांना विरोध केला, म्हणून माझ्याविरुद्ध षडयंत्र रचून हा अविश्वास ठराव आणला गेला, असे सभापती पोखरकर यांनी सांगितले. ते अधिक बोलू इच्छित होते, पण त्यांना पोलिसांनी बोलू दिले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT