No Crowd in the court in pune City due to lock down 
पुणे

लॉकडाउनचा परिणाम : शहरातील न्यायालयांमधील वर्दळ ओसरली

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नवीन लॉकडाऊनमुळे शहरातील सर्व न्यायालयात असलेली वकील आणि पक्षकारांची वर्दळ अत्यंत कमी झाली आहे. जिल्हा व सत्र न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, ग्राहक मंच, राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी) कामगार आणि औद्योगिक न्यायालयासह सर्व न्यायालयात आज सकाळपासूनच खूप कमी प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या शहरातील अनेक न्यायालयात सकाळी एक शिफ्ट मध्येच कामकाज सुरू आहे. मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज होत असल्याने केवळ तात्काळ स्वरूपाचे दावे दाखल करून त्यावर सुनावणी होत आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत (ता.13) न्यायालयात कोरोनापूर्वीचा विचार करता कमी गर्दी होती. मात्र काल रात्रीपासून सुरु झालेल्या लॉकडाउनमुळे न्यायालयात येणाऱ्यांची संख्या अगदीच कमी झाली आहे.

महत्त्वाचा दावा असेल तरच तो दाखल करावा, विनाकारण व पक्षकाराला बरोबर आणून गर्दी करू नये, अशी विनंती वारंवार पुणे बार असोसिएशनकडून वकिलांना करण्यात येत आहे. तर कौटुंबिक न्यायालयात देखील महत्वाचे वगळता इतर कोणतेही केले दावे दाखल केले जात आहेत. एनजीटीचे कामकाज ऑनलाईन सुरू असल्याने तेथील गर्दी नियंत्रणात आहे. तर ग्राहक मंचाचे कामकाज सोमवारपुरते सुरू होणार होते. मात्र लॉकडाऊनमुळे ते होऊ शकले नाही.

Breaking : महाविद्यालय स्तरावर होणार परीक्षा?; 'यूजीसी'चे उपाध्यक्ष काय म्हणाले पाहा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder: सिलेंडरसाठी वाट पाहणं संपलं! इंडेनचा ‘छोटू’ LPG सिलेंडर बाजारात; किराणा दुकानातही सहज मिळणार

माईक हिसकावला आणि स्टेजवरुन हकललं, प्रसिद्ध कॉमेडीयन सुनील पालचा भर कार्यक्रमात अपमान, Viral Video

Central Railway: मध्य रेल्वेवर गोंधळाची परिस्थिती, रुळावर पडून प्रवाशाचा मृत्यू, लोकल सेवा खोळंबली

Latest Marathi News Live Update : - बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात वादळी पावसाचा फटका; मका पिकाचे मोठे नुकसान

Ashok Kharat case investigation : अशोक खरातची एसआयटीकडून ५ तास चौकशी, VIP, महिला आणि व्यवहारांसाठी वेगवेगळे मोबाईल नंबर; धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT