No date of admission given yet Confusion among parents about RTE admission  
पुणे

आरटीई प्रवेशाबाबत संभ्रम; 'या' संदेशामुळे पालक नाराज

सकाळवृत्तसेवा

पुणे : आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी अर्णव (नाव बदललेले आहे) याचा अर्ज. पहिल्या सोडतीत नंबर लागला, पण आता प्रवेशाच्या पोर्टलवर काय आहे पहा....'अर्ज क्रमांक : २०टीयु०४४...' त्यानंतर स्क्रीनवर आलेला संदेश : 'अद्याप प्रवेशाची तारीख दिलेली नाही'

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अर्णवप्रमाणेच प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्याच्या अर्जाची अशीच सद्यस्थिती असल्याचे पाहायला मिळते. शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आर्थिकदृष्टया दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिले जातात.  कोरोनामुळे स्थगित झालेल्या या प्रवेश प्रक्रियेतील दूसरा टप्पा म्हणजे प्रत्यक्षात शाळा प्रवेशाचा मार्ग नुकताच मोकळा झाल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले होते. त्यानुसार पहिल्या सोडतीत (लॉटरी) निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेशासाठी अद्याप शाळांकडून मेजेस आलेला नाही, तसेच आरटीईच्या पोर्टलवर दिलेल्या सुविधेत अर्ज क्रमांक टाकल्यास प्रवेशाची तारीख कळणे अपेक्षित आहे. परंतु तेथेही प्रवेशाची तारीख उपलब्ध होत नाही. या दोन्ही पद्धतीने पालकांना कोणतीही माहिती मिळालेली नाही. परिणामी प्रवेशाबाबत पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसून येते. 

डॉ. कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश, कोरोना चाचण्यांची संख्या वाढणार

मंगळवार पेठेतील सुवर्णा शिंदे म्हणाल्या, "माझ्या मुलाच्या इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठी या अंतर्गत अर्ज केला आहे. पहिल्या सोडतीत नावही जाहीर झाले असून शाळा देखील निश्चित झाली आहे. परंतु प्रवेशाबाबत शाळाकडून कोणताही मेसेज किंवा पोर्टलवर कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पोर्टलवर अर्ज क्रमांक टाकल्यास 'अद्याप प्रवेशाची तारीख दिलेली नाही' अशी माहिती समोर येत आहे. शाळेच्या प्रवेशाबाबत अद्याप कोणतीच माहिती उपलब्ध होत नसल्याने मुलाचे हे वर्ष वाया जाणार की काय, अशी भीती वाटत आहे."तर, काही विद्यार्थ्यांचा अर्ज क्रमांक पोर्टलवर टाकल्यास कोणतीही माहिती समोर येत नसल्याचेही पालकांचे म्हणणे आहे. 

वैष्णवी वल्लाल म्हणाल्या,"पोर्टलवर अर्ज क्रमांक टाकला तरीही कोणतीही माहिती उपलब्ध होत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी प्रवेश निश्चित झाला की नाही, हे कळत नाही. त्यामुळे मुलांच्या प्रवेशाचा मोठा टिढा आमच्यासमोर आहे." प्रवेश निश्चिती झाली आहे की नाही याची माहिती न मिळाल्याने मुलाचे यंदाचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार की काय, असा प्रश्न उपस्थित राहत असल्याचे वल्लाल यांनी सांगितले.
या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष  २०२०-२१ करिता पहिल्या सोडतीद्वारे निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या नावापुढे प्रत्यक्ष प्रवेशाची तारीख लिहिण्यासाठी शाळांना डॉन दिवसांपूर्वी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालकांना दिलेल्या तारखेला शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावयाचा आहे. यानुसार आरटीई प्रवेशाबाबत सविस्तर सूचना सर्व जिल्ह्यांना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. परंतु, प्रत्यक्षात प्रवेशाचा मेसेज मिळत नसल्याचे काही पालकांचे म्हणणे आहे.


प्रवेशासाठी तारीख देण्याचा शाळांना अधिकार 
"प्रत्येक शाळेला तेथील स्थानिक परिस्थिती आणि प्रवेशासाठी गर्दी होणार नाही, हे पाहून विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी तारीख देण्याचा अधिकार दिला आहे. त्यानुसार शाळा माहिती अपडेट करतील आणि त्याप्रमाणे पालकांना मेसेज जाईल आणि पोर्टलवर देखील प्रवेशाचा दिनांक पाहता येणार आहे. मात्र, गेल्या दोन दिवसात किती शाळांनी प्रवेशासाठी तारखा दिल्या ही माहिती आता उपलब्ध नाही. परंतु शाळांनी तारखा दिल्यानंतर त्या पोर्टलवर लगेच अपडेट होतील. त्यामुळे पालकांनी सातत्याने
पोर्टलवर प्रवेशाची माहिती तपासावी."
- दिनकर टेमकर, शिक्षण सहसंचालक (प्राथमिक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Income Tax Notice Scam : तुम्हालाही इन्कम टॅक्सची नोटीस आलीय ? आजिबात करु नका 'ही' चूक, होईल मोठे नुकसान

झाकीर खानची तब्येत बिघडली! मुंबईच्या लीलावती रुग्णालयात केलं भर्ती, नक्की झालं काय?

Uri Encounter: अफगाणिस्तानवर हल्ल्यानंतर पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!

धक्कादायक! आधीच टंचाई त्यात गॅस सिलिंडरची चोरी, ७६ चोरले पण फक्त १२ भरलेले...

Ahmedabad Plane Crash : वैमानिकाच्या चुकीमुळे नाही तर 'या' मुळे घडली अहमदाबाद विमान दुर्घटना, अमेरिकेच्या तपास संस्थेचा दावा

SCROLL FOR NEXT