मार्केट यार्ड : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील मुख्य बाजारासह उपबजारात शेतीमाल विक्रीला आणण्यासाठी शेतकर्यांना परवाना अथवा कोणत्याच ओळखपत्राची गरज नाही. शेतीमाल बाजारात आणण्यासाठी परवान्याची आवश्यकता असल्याचा शेतकर्यांचा गैरसमज झाला आहे. शेतकऱ्यांनी शेतीमाल बाजारात आणावा. तसेच शेतीमालाबाबत काही अडचणी आल्यास बाजार समिती प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासक बी.जे. देशमुख यांनी सोमवारी केले.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बाजारातील गर्दी टाळण्यासाठी केवळ घाऊक खरेदीला परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतीमाल खरेदी करण्यासाठी येणार्या व्यापार्यांना परवाना आवश्यक करण्यात आला आहे. त्यामुळे परवाना असणार्या व्यापार्यांनाच बाजारात प्रवेश दिला जात आहे. परवान्याचे बंधन माल खरेदीसाठी येणार्या व्यापार्यांसाठी आहे. शेतकर्यांसाठी नाही. त्यामुळे शेतकर्यांना माल विक्रीला आणण्यास बाजारात कोणत्याच प्रकारचे बंधन नसल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
मार्केटयार्डातील मुख्य बाजारात रात्री 9 ते पहाटे 4 वाजेपर्यंत शेतीमालाच्या गाड्यांना बाजारात प्रवेश दिला जात आहे. गुळ-भुसार, मोशी, खडकी, उत्तमनगर आणि मांजरी उपबाजारातील खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू आहेत. मुख्य बाजारासह उपबाजारातही शेतकरी शेतीमाल घेऊन येऊ शकतात. असेही देशमुख यांनी सांगितले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सोमवारी मार्केट यार्डातील मुख्य बाजारात 480 गाड्यांमधून 13 हजार 800 क्विंटल शेतीमालाची आवक झाली. तर, मोशी उपबाजार 190 गाड्यांम्धून 3 हजार क्विंटल, खडकी उपबाजार 8 गाड्यातून 100 क्विंटल, उत्तमनगर उपबाजार 14 गाड्यातून 50 क्विंटल शेतीमालाची आवक झाली.
शेतकऱ्यांना परवाना असल्याशिवाय बाजारात खरेदीसाठी माल आणता येत नाही, अशी अफवा पसरली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. वास्तविक शेतकऱ्यांना बाजारात शेतीमाल विक्रीसाठी आणण्याकरिता कोणत्याही परवान्याची गरज नाही. शेतकऱ्यांनी बिनधास्त माल विक्रीस आणावा. - बी जे. देशमुख, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.