no lockdown will implemented minister rajesh tope statement pune 
पुणे

लॉकाडाउन संदर्भात मंत्री राजेश टोपे यांची मोठी घोषणा; वाचा सविस्तर बातमी

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन होणार नाही तर आता ‘अनलॉक’च असेल,' असे शुक्रवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. तर, ‘राज्यात करोनाच्या चाचण्या हव्या त्या प्रमाणात होत नाहीत आणि मृत्यूदर लपवला जातो,’ असा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप खोडून काढताना चाचण्यांच्या आकडेवारीसह स्पष्टीकरण दिले. करोनाची लस येत नाही तोवर, सोशल डिस्टंसिंग, मास्क आणि सॅनिटायजेशन या "एसएमएस' प्रणालीचा अवलंब करूनच जनतेला आयुष्य जगावे लागेल, असेही ते म्हणाले.

पुणे शहरात करोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राजेश टोपे यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधींची बैठक आज झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना टोपे पुन्हा लॉकडाउन होणार नसल्याचे सांगितले. पुणे, मुंबई आणि करोनाचा प्रादुर्भाव वाढत असलेल्या ठिकाणी जुलै महिन्यांपर्यंत पुरतील इतक्‍या बेडची सुविधा करण्यात आली आहे. जुलै महिन्यात आढावा घेऊन पुढील तयारी करण्यात येईल. सध्या करोनाची वाढत चाललेली संख्या हा चिंतेचा विषय नसून मृत्यूदर कमी करणे, यावर आम्ही अधिक भर देत आहोत, असेही ते म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी फडणवीस यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आरोप केले होते. त्यावर बोलताना टोपे म्हणाले,"" मुंबई आणि पुण्यात दर एक लाख संख्येमागे होणाऱ्या चाचण्यांची संख्या ही देशामध्ये इतर राज्यांमध्ये होत असलेल्या संख्येपेक्षा सर्वाधिक आहे. त्यामुळे चाचण्या कमी होत आहेत, या आरोपांमध्ये तथ्य नाही. मृत्यूचे आकडे काही प्रमाणात पुढे मागे होत असले तरी सरकारने कोणतीही आकडेवारी लपवलेली नाही. विरोधकांनी मागणी केल्यास त्यांना आकडेवारी देऊ.'' प्रतिबंधित क्षेत्राचा (कन्टेंमेंट झोन) आढावा घेतला तर मुंबई आणि पुण्यात सुरूवातीपासून प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या परिसरामध्ये आता नवे रुग्ण सापडण्याचा वेग मंदावला आहे. परंतु, राज्याच्या इतर भागात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या नागरिकांच्या स्थलांतरामुळे रुग्ण वाढल्याने रुग्णसंख्येत मोठ्याप्रमाणावर वाढ होत असल्याचे, टोपे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rated Today: आठवड्याच्या शेवटी सोनं स्वस्त! उच्चांकापासून ₹31 हजारांनी घसरलं; ताजा भाव पाहा

IND vs PAK Final: भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली! वैभव सूर्यवंशीसह ‘या’ खेळाडूंना Playing XI मध्ये संधी; पण पाकच्या कॅप्टनसोबत हात मिळवला का?

Miraj Incident : तीन मजली इमारतीवरून पडून दीड वर्षांचे बाळ गंभीर मिरज येथे मंगळवार पेठेतील घटना

Hidden Lakes in India: तलावाच्या काठावरचं हे जग पाहिलंय का? भारतातील ५ ठिकाणं पाहून थक्क व्हाल, लगेच कराल ट्रिप प्लॅन

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

SCROLL FOR NEXT