remdesivir
remdesivir Team Esakal
पुणे

पुण्यात आता हॉस्पिटलमध्येही 'रेमडेसिव्हर'चा खडखडाट

योगिराज प्रभुणे

पुणे : औषधांच्या बाजारपेठेत आतापर्यंत जाणवणारा रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा खडखडाट बुधवारी शहरातील प्रमुख रुग्णालयांनीही जाणवला. रुग्णालयात उपचारांसाठी तीनशे रुग्ण दाखल आहेत. पण, एकही रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळत नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत रुग्णांवर उपचार करायचे तरी कसे, असा सवाल पुण्यातील डॉक्टरांनी ‘सकाळ’कडे केला.कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिव्हिर हे प्रभावी ठरत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे. अत्यवस्थ होणाऱ्या रुग्णांना हे इंजेक्शन दिल्यास त्याची प्रकृती सुधारते, असे अनुभवातून दिसून आले आहे. गेल्या महिन्याभरापासून कोरोनबाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे उपचारांसाठी दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढले. रेमडेसिव्हिर इंजेक्शन डॉक्टरांनी लिहून द्यायला सुरवात केली. पण, त्याचा पुरवठा मर्यादित असल्याचे शहरातील औषध दुकानांमध्ये आणि वितरकांकडे त्याचा तुटवडा निर्माण झाला.या इंजेक्शनच्या तुटवड्यातून मार्ग काढण्यासाठी नोंदणीकृत कोविड रुग्णालयांना इंजेक्शनचा पुरवठा करण्याचे आदेश प्रशासनाने दिले. पण, आता औषधांच्या बाजारपेठेप्रमाणेच रुग्णालयांमध्येही या इंजेक्शनचा खडखडाट झाल्याचे वेगवगेळ्या रुग्णालयांशी बोलल्यानंतर तेथील डॉक्टरांनी सांगितले.

नोबल हॉस्पिटलचे डॉ. एच. के. साळे म्हणाले, ‘‘रुग्णालयात उपचारांसाठी २८५ रुग्ण दाखल आहेत. अगदी मंगळवारपर्यंत इंजेक्शनचा पुरवठा काही प्रमाणात का होईना सुरू होता. पण, आज पुरवठा झाला नाही. इंजेक्शन मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधण्यात येत आहे. मात्र, हे इंजेक्शन मिळेपर्यंत रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना तोंड द्यायचे कसे, हा प्रश्न पडतो.’’

इंजेक्शन मिळण्यासाठी वितरकांकडे वारंवार पाठपुरावा सुरू आहे. पण, तेथेही इंजेक्शनचा पुरवठा झाला नसल्याचे सांगण्यात येते. रुग्णांना इंजेक्शन दिले नाही, तर उपचार करायचे कसे, असा सवालही शहराच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमधील डॉक्टरांनी केला.

अखेर परराज्यातून पुण्यात रेमडेसिव्हिर

''माझे नातेवाइक कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल आहेत. त्यांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन डॉक्टरांनी लिहून दिले आहे. औषधाच्या बाजारपेठेतील दुकान न् दुकान पालथे घातले. कोणी सांगेल तिथे चार दिवस अक्षरशः जीवाच्या आकांताने पळत होतो. पण, इंजेक्शन काही मिळेना. अखेर परराज्यातून तेथील नातेवाइकांच्या मदतीने ते मिळाले.'' असे एका रुग्णाचा नातेवाइक सांगत होता.

रेमडेसिव्हिर मिळत नसल्याने अत्यवस्थ रुग्णाचा चेहरा सतत समोर यायचा. त्याचवेळी परराज्यातील नातेवाइकांचा फोन आला. त्यांना महाराष्ट्रातील रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्याची माहिती दिली. त्यांनी दक्षिणेतील राज्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळवले. ते आता पुण्यात येत आहेत. त्यामुळे माझ्या रुग्णाचे प्राण वाचतील... हे बोलताना त्याच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.

विक्रेते- नातेवाइकांत वाद

रेमडेसिव्हिर इंजेक्शनवरून औषध विक्रेते आणि नातेवाइकांमधील वाद वाढत आहे. ससून रुग्णालयातील औषध दुकानामध्ये फार्मासिस्ट आणि नातेवाइकांमध्ये भांडण झाल्याची घटना बुधवारी घडली.

रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळण्यासाठी सकाळी सातपासून ससून रुग्णालयाच्या परिसरातील औषध दुकानामध्ये नातेवाइकांनी गर्दी केली होती. दुपारपर्यंत हे नातेवाइकांनी संयम ठेवला. मात्र, त्यानंतर रांगेत नसलेल्या व्यक्तीला इंजेक्शन दिल्याची माहिती नातेवाइकांना मिळाली. त्यानंतर मात्र त्यांचा संयम सुटला. त्यामुळे औषध दुकानांमधील कर्मचारी आणि नातेवाईक यांच्यात जोरदार भांडण झाले.या बाबत बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

शहरातील औषध विक्रेत्यांचाही असाच अनुभव आहे. फार्मासिस्ट राकेश कदम म्हणाले,‘‘रात्री-अपरात्री कितीही वाजता रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी फोन येतात. अशा वेळी काही जण अक्षरशः काकुळतीला येऊन बोलतात. त्यामुळे आपल्या डोळ्यात अक्षरशः पाणी येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT